Saturday, 10 May 2025
  • Download App
    पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली प्राचीन शिल्पे; विष्णू व महिषासूर मर्दिनीची मूर्ती Ancient sculptures found in the basement of the Vitthal temple in Pandharpur

    पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली प्राचीन शिल्पे; विष्णू व महिषासूर मर्दिनीची मूर्ती

    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : जगभरातील हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या तळघरात काही प्राचीन मूर्ती आणि इतर अवशेष सापडले आहेत. यात विष्णू व महिषासूर मर्दिनीच्या मूर्तीचा समावेश आहे. या मूर्ती सोळाव्या शतकातील असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.Ancient sculptures found in the basement of the Vitthal temple in Pandharpur

    पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार तळघरात सापडलेल्या मूर्तीत महिषासुर मर्दिनी व विष्णू मूर्तीचा समावेश आहे. याशिवाय पादुका, काचेच्या बांगड्या आणि काही नाणीही या तळघरात सापडली आहेत.

    दगड काढताना आढळले तळघर

    खचलेला दगड काढताना हे तळघर निदर्शनास आले. पुरातत्व विभागाच्या वतीने याची तपासणी करण्यात आली. सध्या मंदिर परिसरात जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कामामुळे काही महिन्यांपासून विठ्ठल मुर्तीचे केवळ मुखदर्शन सुरू होते. मात्र, आता गाभाऱ्यााचे काम पूर्ण झाले आहे. याच दरम्यान हे तळघर आढळून आले.



    हनुमान गेटजवळ तळघर, रात्री 2 वाजता आढळले

    विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या हनुमान गेटजवळ ही गुप्त खोली सापडली आहे. त्यामध्ये पुरातन मुर्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काल रात्री 2 वाजता ही गुप्त खोली आढळून आली आहे. मंदिर समितीसह अध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभागाच्या टीमने याची पाहणी केली.

    Ancient sculptures found in the basement of the Vitthal temple in Pandharpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला