• Download App
    संवेदनशील विकास म्हणत आनंद महिंद्र यांनी केले नितीन गडकरी यांचे कौतुक|Anand Mahindra praises Nitin Gadkari for sensitive development

    संवेदनशील विकास म्हणत आनंद महिंद्रा यांनी केले नितीन गडकरी यांचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई-नागपूर महामार्गावर प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठीही उड्डारपूल बनविले आहेत. यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाला संवदेनशील विकास म्हणत ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे. आम्हाला अशा पायाभूत सुविधांचा विकास हवा आहे,Anand Mahindra praises Nitin Gadkari for sensitive development

    जो आपल्या आधीपासून या पृथ्वीवर राहत असलेल्या जिवांप्रति संवेदनशील असेल, असे त्यांनी म्हटले आहे.आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून समृद्धी महामार्ग म्हणजेच मुंबई-नागपूर महामागार्बाबत एक बातमी शेअर केली आहे. मुंबई-नागपूर महामार्गावर प्राण्यांसाठी खास उड्डाणपूल बनवण्यात आले आहेत.



    त्यामुळे त्यांना जंगलाच्या एका भागातून दुसºया भागात जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही. बिबट्यासारखे वन्य प्राणी रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी या संपूर्ण महामागार्ला कुंपणही घालण्यात येत आहे. ही बातमी त्यांनी ट्विट केली आहे.

    मुंबई-नागपूर महामार्ग सुमारे 700 किलोमीटर्स लांबीचा आहे. हा महामार्ग देशातला पहिलाच असा महामार्ग असेल, जिथे असा ‘अ‍ॅनिमल फ्लायओव्हर’ किंवा ‘वाइल्ड लाइफ ओव्हरपास’ बांधला जाणार आहे. या संपूर्ण महामागार्चा 117 किमीचा प्रवास जंगल, टायगर कॉरिडॉर आणि इको-सेन्सिटिव्ह झोनमधून जातो.

    यासाठी एकूण 9 वाइल्डलाइफ ओव्हरपास आणि 17 अंडरपास बनवण्यात आले आहेत. हा महत्त्वाकांक्षी महामार्ग तयार झाल्यानंतर दोन्ही शहरांमधलं प्रवासाचं अंतर खूप कमी होणार आहे. नागपूर-मुंबई प्रवासासाठी सध्या 16 तास लागतात. हा हायवे सुरू झाल्यानंतर केवळ 8 तास लागतील.

    या ग्रीन ब्रिजचं बांधकाम सुरू असून, काम वेगानं सुरू आहे. काही बांधकामंही पूर्ण झाली आहेत. यापैकी बहुतेक संरचना 32, 45 आणि 60 मीटर रुंद आणि 120 मीटर लांब आहेत. यामध्ये वृक्षारोपण करण्यात येईल. तसंच खाली रहदारी सुरू असतानाही प्राण्यांना सुरक्षितपणे रस्ते ओलांडता यावेत, यासाठी त्याची रचना नैसर्गिक जंगलासारखी करण्यात येईल, जेणेकरून प्राण्यांना त्रास होणार नाही.

    Anand Mahindra praises Nitin Gadkari for sensitive development

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !