• Download App
    आनंद महिंद्रांनी पाळला शब्द ,दत्तात्रय लोहार यांना जुगाड जीपच्या बदल्यात मिळाली नवी कोरी बोलेरो। Anand Mahindra keeps his word, Dattatraya Lohar gets new Corey Bolero in exchange for Jugaad Jeep

    आनंद महिंद्रांनी पाळला शब्द ,दत्तात्रय लोहार यांना जुगाड जीपच्या बदल्यात मिळाली नवी कोरी बोलेरो

    सुरुवातीला दत्तात्रय लोहार यांनी आपण ही जीप देऊ शकत नाही असे म्हटले होते पण ही जीप संशोधनासाठी ठेवण्यात येणार आहे असे म्हटल्यावर कुटुंबाशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला. Anand Mahindra keeps his word, Dattatraya Lohar gets new Corey Bolero in exchange for Jugaad Jeep


    विशेष प्रतिनिधी

    सांगली : दत्तात्रय लोहार यांनी काही महिन्यांपूर्वी जुगाड जीप तयार केली.दरम्यान त्यांना वाटलंही नव्हतं की या जीपची चर्चा गावभरच नव्हे, तर अख्ख्या देशात होईल.दरम्यान महिंद्रा कंपनीला आपली जुगाड जिप्सी गाडी घेऊन दत्तात्रय लोहार यांनी महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी देऊ केलेली ऑफर स्वीकारली आहे. सांगली मध्ये आज महिंद्रा कंपनीच्या शोरूम मध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या उपस्थितीत हा गाडी आदान-प्रदान सोहळा संपन्न झाला.यावेळी जुगाड जीप फेम दत्तात्रय लोहार यांना नवीकोरी बोलेरो देण्यात आली.

    ‘जुगाड जीप’ला किक मारतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.दरम्यान जुगाड तंत्रज्ञानावर लक्ष असणाऱ्या महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्या पाहण्यात हा व्हिडिओ आला.दरम्यान आनंद महिंद्रा यांनी 21 डिसेंबर 2021 ला आपल्या ट्विटर हँडलवरुन हा व्हीडिओ शेअरही केला.



    दरम्यान दुसऱ्या दिवशी नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर दत्तात्रय यांना एक नवी कोरी बोलेरो जीप ऑफर केली आहे.सुरुवातीला दत्तात्रय लोहार यांनी आपण ही जीप देऊ शकत नाही असे म्हटले होते पण ही जीप संशोधनासाठी ठेवण्यात येणार आहे असे म्हटल्यावर कुटुंबाशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला.

    ‘ही जुगाड जीप प्रेरणा देईल’

    आनंद महिंद्रा आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हणाले की – “स्पष्टपणे हे कोणत्याच नियमात बसत नाही.पण जिद्द, कल्पकता आणि ‘स्वस्तात जास्त’ देण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करण्यासाठी मी कधीच थांबवणार नाही.तसेच फ्रंट ग्रीलविषयी बोलायला नको कारण व्हीडिओत दिसत असणारं फ्रंट ग्रील महिंद्रा अँण्ड महिंद्राच्या जीप मॉडेलसारखं आहे.”

    Anand Mahindra keeps his word, Dattatraya Lohar gets new Corey Bolero in exchange for Jugaad Jeep

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस