- पुण्यात ‘कीप आर्ट अलाईव्ह’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन,
विशेष प्रतिनिधी
पुणे : चित्रकार आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आनंद जोग यांनी पेन आणि शाई या माध्यमातून रेखाटलेली तब्बल ३५० हून अधिक सुरेख चित्रे पाहण्याची संधी पुणेकर कलारसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘कीप आर्ट अलाईव्ह’ या अनोख्या चित्रप्रदर्शनाचे. विशेष म्हणजे एकाच चित्रकाराने एकाच माध्यमात रेखाटलेल्या चित्रांचे इतक्या मोठ्या स्वरूपातील हे बहुधा पहिलेच प्रदर्शन असणार आहे.An opportunity for Pune residents to see more than 350 beautiful works of art drawn through ‘pen and ink’
हे प्रदर्शन शुक्रवार २१ एप्रिल ते रविवार दि २३ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व कलादालन इथे होणार आहे. या प्रदर्शनासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य असेल. शुक्रवार २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
आनंद जोग यांचे हे सातवे प्रदर्शन असून यापूर्वी २००४ साली त्यांनी बालगंधर्व कलादालन इथं पहिले चित्रप्रदर्शन भरविले होते. त्याचबरोबर २००८ साली दुबई व २०१४ साली लंडन येथेही त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये पेन व शाईच्या माध्यमातून साकारण्यात आलेली चित्रे, अॅक्रेलिक रंग, जलरंग आणि चारकोल प्रकारातील चित्रे यांचा समावेश होता.
यंदाच्या ‘कीप आर्ट अलाईव्ह’ या चित्रप्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनात पेन व शाई या एकाच माध्यमातून साकारलेली चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. या प्रदर्शनात गणपती, देवी-देवता, विविध प्रकारची पाने व फुले, प्राणी, पक्षी त्याचबरोबर एखाद्या घटकावर आधारित अर्थात ‘ऑब्जेक्ट बेस्ड’ चित्रांचा समावेश असणार आहे.
ही चित्रे रेखाटण्यासाठी विविध बिंदू-आकार आणि जाडी असलेल्या जगभरातील २५० प्रकारच्या पेनांचा वापर करण्यात आला आहे. कागदावर आणि कॅनव्हासवर ही चित्रे काढण्यात आली असून चित्रांचे बारकावे आणि त्याच्या स्टीपलिंग व लाईन वर्क या शैलींवर त्यांनी अधिक काम केले आहे. आनंद जोग हे साधारण २०१५-२०१६ सालापासून या चित्रांवर काम करत होते, यापैकी अनेक चित्रे लॉकडाऊन काळातही रेखाटण्यात आली आहेत.
An opportunity for Pune residents to see more than 350 beautiful works of art drawn through ‘pen and ink’
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या बंडाला 40 आमदारांचा पाठिंबा; तरीही शरद पवारांचा “प्रतिडाव” नाही??; भाजपच्या फायनल कॉलची प्रतिक्षा??
- महागाई पुन्हा रुळावर! : केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश, या 5 गुड न्यूजमुळे आर्थिक आघाडीवर मिळेल दिलासा
- द फोकस एक्सप्लेनर : मुख्यमंत्री-पंतप्रधानांच्या अटकेचे काय आहेत नियम? सीबीआय थेट अटक करू शकते का? वाचा सविस्तर
- आधीच कडक उन्हाळा त्यात सभा, रॅलींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण टिपेला अन् झळा मात्र जनतेला!