• Download App
    ब्राह्मणांना 3 मिनिटांत संपवू म्हणणारा योगेश सावंत पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी; रोहित पवारांचे पोलिसांना फोन; विधानसभा अध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश!! An official of Yogesh Sawant Pawar's NCP who said to finish Brahmins in 3 minutes

    ब्राह्मणांना 3 मिनिटांत संपवू म्हणणारा योगेश सावंत पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी; रोहित पवारांचे पोलिसांना फोन; विधानसभा अध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला शरद पवारांच्याच राष्ट्रवादीची फूस असल्याचे एकेक धागेदोरे आता उलगडू लागले आहेत. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आई माई वरून शिव्या दिल्यानंतर त्यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष एसआयटी चौकशीचे आदेश दिले. An official of Yogesh Sawant Pawar’s NCP who said to finish Brahmins in 3 minutes rohit pawar phone calls to police to save yogest chavan

    त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मणांना 3 मिनिटांत संपून टाकू, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातिवादाचे विष किती मोठ्या प्रमाणावर फैलावले आहे, हे उघड्यावर आले.

    या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र विधानसभेत आणखी एक धक्कादायक खुलासा झाला. देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मणांना 3 मिनिटांत संपवण्याची भाषा करणारा योगेश सावंत नावाचा इसम याचा पत्ता बारामतीचा निघाला आणि तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. या जातीवादाचे विष फैलावणाऱ्या या वक्तव्यात योगेश सावंत अडकताच त्याला सोडवण्यासाठी आमदार रोहित पवारांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केल्याचेही उघड झाले.

    हे सगळे प्रकरण भाजपचे आमदार राम कदम आणि आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत लावून धरले. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली विधानसभेत शरद पवारांचे नाव घेतले गेले ज्याचे नाव घ्यायचे त्याला आधी नोटीस द्यावी लागते असा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून या संपूर्ण प्रकरणात थोडाफार बचावाचा प्रयत्न केला. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडण्याची आणि ब्राह्मण समाजाला 3 मिनिटांत संपवण्याची भाषा करणाऱ्या योगेश सावंत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेच्या तालिका अध्यक्षांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले.

    मनोज जरांगे यांची आक्रस्ताळी वक्तव्ये आणि त्या पाठोपाठ ब्राह्मण समाजाला 3 मिनिटांत संपवण्याचे गंभीर वक्तव्य विधानसभेच्या रेकॉर्डवर आल्याने या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय आणि कायदेशीर गांभीर्य फार वाढले आहे. चौकशीअंती याचे फार गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहेत.

    An official of Yogesh Sawant Pawar’s NCP who said to finish Brahmins in 3 minutes rohit pawar phone calls to police to save yogest chavan

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा