• Download App
    मेट्रो चे सामान चोरून नेताना रोखणाऱ्या अधिकाऱ्याला टोळक्याकडून बेदम मारहाण|An officer who was trying to steal Metro's luggage was beaten by a mob

    मेट्रो चे सामान चोरून नेताना रोखणाऱ्या अधिकाऱ्याला टोळक्याकडून बेदम मारहाण

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मेट्रोचे सामान चोरून नेताना रोखणाले म्हणून पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीमध्ये म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी येरवडा येथील मेट्रो रेल्वे बांधकाम साईटवर घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.An officer who was trying to steal Metro’s luggage was beaten by a mob

    या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश वेदपाठक (वय 3०) अनुज जोगदंड (वय 22), विशाल बंगाली (वय 35) आणि पजा (वय 23) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर खंडेराव बेंद्रे (वय 62, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंद्रे हे पुणे मेट्रो कॉर्पोरेशन मध्ये ट्राफिक ऑफिसर म्हणून काम करतात.



    आरोपी महेश वेदपाठक हा 22 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या लोखंडी प्लेट रिक्षा मधून चोरून नेत होता. त्यावेळी बेंद्रे यांनी त्याला पकडल्यामुळे झटापट झाली. या झटापटीत दुखापत झाल्याचे कारण देत आरोपी वेदपाठक याने उपचारासाठी बेंद्रे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती.

    मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावेळी आरोपीनी त्यांना बघून घेण्याची धमकी देत मारहाण केली होती. तसेच त्यांचे सहकारी अनिल गायकवाड यांच्या वर दगडफेक करून त्यांना जखमी केले होते. या दगडफेकीत त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे फ्रॅक्चर झाली होती.

    या मारहाणीत जखमी झालेले बेंद्रे हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वारंगुळे करीत आहेत.

    An officer who was trying to steal Metro’s luggage was beaten by a mob

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू