• Download App
    navi Mumbai नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टम निर्माण केले जाणार

    Navi Mumbai नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टम निर्माण केले जाणार

    जागतिक दर्जाच्या थीम पार्कसाठी राज्य शासन सकारात्मक ; दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार Navi Mumbai 

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी, मुंबई येथे ‘वेव्ह्ज 2025’ मध्ये ‘स्टुडिओ आणि तंत्रज्ञान’ विषयावर राऊंड टेबल चर्चा संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई हे सर्जनशीलतेचे केंद्र असल्याचे नमूद करून, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचे जागतिक स्थान अधिक मजबूत करण्यासाठी तिसऱ्या मुंबईत (नवी मुंबई परिसरात) आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टम निर्माण केले जाणार असल्याचे सांगितले. Navi Mumbai

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नवी मुंबईत जागतिक दर्जाच्या थीम पार्कसाठी राज्य शासन सकारात्मक आहे. यासाठी प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले असून, यामुळे मुंबईमध्ये अत्याधुनिक स्टुडिओ सुविधा उपलब्ध होतील. याशिवाय, आयआयटी मुंबईच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या आयआयसीटी (IICT) संस्थेमार्फत सर्जनशील उद्योगांसाठी विशेष अभ्यासक्रम राबवले जातील, जे नव्या पिढीला करिअरची नवी दारे खुली करतील.

    ई-स्पोर्ट्स क्षेत्रासाठी धोरणात्मक पाठबळ, प्रशिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चित्रपट, वेबसिरीज, जाहिराती आणि इतर व्हिज्युअल कंटेंटच्या चित्रीकरणासाठी परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान करण्यात आली आहे. आता नोंदणी, अर्ज व शुल्क भरणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर केवळ सात दिवसांत परवानगी मिळते.

    या महत्त्वाच्या बैठकीला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, स्टार्टअप्स, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचे प्रतिनिधी, अभिनेते आमिर खान, एफआयसीसीआयचे आशिष कुलकर्णी, पी. जयकुमार रेड्डी तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

    An international-class creative ecosystem will be created in Navi Mumbai

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    म्हणे, शिंदे + अजितदादा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; पण यात संजय राऊतांनी कोणता मोठ्ठा “जावईशोध” लावला??

    काकांनी सल्ला ऐकला नाही, आता अजितदादांचा के. पी. पाटलांना सल्ला; 84 चे होणार आहात, आता रिटायरमेंट घ्या!!

    Devendra Fadnavis : WAVES 2025 परिषदेमध्ये 8000 कोटींचे सामंजस्य करार; तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टीम!!