• Download App
    कल्याण-डोंबिवलीच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याचा लोकल ट्रेन पकडताना गेला तोल ; गमवावा लागला जीवAn employee of the health department of Kalyan-Dombivali lost his balance while catching a local train; Life was lost

    कल्याण-डोंबिवलीच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याचा लोकल ट्रेन पकडताना गेला तोल ; गमवावा लागला जीव

     

    नामदेव गावित हे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय विभागात कामाला होते. ड्रेसर म्हणून ते काम करत होते.An employee of the health department of Kalyan-Dombivali lost his balance while catching a local train; Life was lost


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अनेकदा रेल्वे स्टेशनवर धावती लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात काहीना काहीना घटना घडतच असतात.तसेच स्टेशनवर धावती लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करु नका अशी सूचना केली जात असते. शनिवारी अशीच एक घटना घडली आहे. ज्यात कल्याण-डोंबिवलीच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.नामदेव गावित (वय ५६) असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे.

    नेमकी घटना काय घडली?

    नामदेव गावित हे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय विभागात कामाला होते. ड्रेसर म्हणून ते काम करत होते.नामदेव गावित शनिवारी आपल्या अर्ध्या दिवसाचं काम संपवून घरी निघाले होते.त्यावेळी ते डोंबिवली स्थानकात दुपारी १ वाजून ३ मिनीटांनी अंबरनाथला जाणारी लोकल गावित पकडायला गेले.

    परंतु लोकल सुरु झाल्यामुळे त्यांना लोकलचा अंदाज सापडला नाही आणि त्यांचा तोल गेला.दरम्यान तोल गेल्यामुळे ते गाडीसोबत फरफटत गेले. फरफटत गेल्याने ते लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये तोल जाऊन पडले.ज्यामुळे गावित यांचा जागेवरच मृत्यू झाला. गावित यांचा मृतदेह कल्याणच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अशी पोलिसांनी माहिती दिली.

    An employee of the health department of Kalyan-Dombivali lost his balance while catching a local train; Life was lost

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस