विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशकात वैयक्तिक भांडणातून दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र आव्हाड यांनी देखील कोणतीही शहानिशा न करता आधी तेल ओतण्याचा प्रकार केला.An attempt to create strife between two communities through personal strife in Nashak; Jitendra Awha’s fuel in the fire without any verification!!
या संदर्भात नाशिक पोलिसांनी सविस्तर पत्रक प्रसिद्ध करून वस्तुस्थिती समोर आणली. त्यामध्ये काळाराम मंदिरात पोस्टर लावणारा हा दलित तरुण असल्याचेच स्पष्ट झाले. वैयक्तिक भांडणातून या तरुणाने सामाजिक तर उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणारे पोस्टर काळाराम मंदिरात चिकटवल्याचे तपासात निष्पन्न झाले.
काळाराम मंदिरा बाहेर लावण्यात आलेले आक्षेपार्ह पोस्टर हे ‘अमोल चंद्रकांत सोनवणे’ नामक व्यक्ती कडून लावण्यात आले. अमोल चंद्रकांत सोनवणे हा व्यक्ती स्वतः SC म्हणजे दलित प्रवर्गातून आहे. अमोल चंद्रकांत सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भातली बातमी अशी :
जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी हिंदू युवा वाहिनीचे एक पत्रक पोस्ट केले होते. या पत्रकात जय श्रीराम व जय हिंदू राष्ट्रचा नारा देत काळाराम मंदिर परिसरात राहणाऱ्या सर्व दलित समाजाच्या लोकांना आपल्या घरांवरील निळे, पिवळे झेंडे काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती.
याशिवायही या पत्रकात दलितांविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती. तसेच कट्टर हिंदूंना त्यांचा स्पर्श टाळण्याचा सल्लाही यात देण्यात आला होता. काळाराम मंदिर परिसरात कुठेही निळा, पिवळा झेंडा लावू नये. त्यानंतरही कुणी लावण्याचे धाडस केले, तर त्यांच्या पाठीवर पुन्हा झाडू व गळ्यात मडके देण्यात येईल. हे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे काळाराम मंदिर परिसरासारख्या पवित्र ठिकाणचे असे झेंडे तत्काळ काढून टाकण्यात यावेत. कुणी पुन्हा निळा झेंडा हातात घेऊन फिरताना दिसला तर त्याला वाळीत टाकण्यात येईल, असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आला होता. या पत्रकावर प्रथमेश संदीप चव्हाण नामक हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्याचे नाव होते.
दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. प्रत्यक्षात पोलीस तपासामध्ये वेगळीच बाब समोर आली. संदीप चव्हाण आणि अमोल सोनवणे यांचे वैयक्तिक भांडण होते. त्या वैयक्तिक भांडणात संदीप चव्हाण याची बदनामी व्हावी या हेतूने संबंधित पत्रक तयार करण्यात आले. ते काळाराम मंदिरामध्ये चिटकवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ताबडतोब तपास करून या सगळ्या प्रकाराचा छडा लावला.
मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात कोणतीही शहानिशा न करता स्वतःच्या ट्विटर हँडलवरून संबंधित पत्रक शेअर केले. जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही किड संपवा. कोण असेल त्याला बेड्या ठोका. आता निळा झेंडा घेऊनच काळाराम मंदिरात जाणार. बघू कोण रोखते ते, असे आव्हाड यांनी या प्रकरणी हे पत्रक जारी करणाऱ्यांना इशारा देताना म्हटले. असे म्हणताना त्यांनी खऱ्या प्रकाराची दखलच घेतली नसल्याची वस्तूस्थिती समोर आली.
An attempt to create strife between two communities through personal strife in Nashak; Jitendra Awha’s fuel in the fire without any verification!!
महत्वाच्या बातम्या
- Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सत्र न्यायालयातून जामीन
- बंगाल मधून काँग्रेस संपवून ममता केरळच्या वायनाडमध्ये प्रियांका गांधींचा प्रचार करायला तयार!!
- जरांगे – ओबीसी नेते समोरासमोर बसून आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा, ओबीसी विकासासाठी उपसमिती; शिंदे – फडणवीस सरकारची भूमिका!!
- मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रात जातिवाद भडकावून पोळी भाजण्याची खेळी नेमकी कुणाची??