• Download App
    आम आदमी पार्टीच्या आमदाराने दिल्ली विधानसभेत काढल्या नोटांच्या गड्ड्या; नर्सिंग भरतीसाठी लाच दिल्याचा आरोप An Aam Aadmi Party MLA removed the piles of currency notes in the Delhi Assembly

    आम आदमी पार्टीच्या आमदाराने दिल्ली विधानसभेत काढल्या नोटांच्या गड्ड्या; नर्सिंग भरतीसाठी लाच दिल्याचा आरोप

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार मोहिंदर गोयल यांनी भर दिल्ली विधानसभेत आपल्या जवळच्या पिशवीतून नोटांच्या गड्ड्या काढून दाखवल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मध्ये नर्सिंग भरतीसाठी आपल्याला लाच म्हणून ही रक्कम दिल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे. त्याच वेळी त्यांनी दिल्लीत दबंग आणि माफिया लोक कसे उजळ माथ्याने फिरत आहेत, याचे वर्णन देखील केले आहे. An Aam Aadmi Party MLA removed the piles of currency notes in the Delhi Assembly

    दिल्लीमध्ये काही लोकांनी आपल्याला नर्सिंग कॉलेजमधील भरतीसाठी लाचेची रक्कम आणून दिली. माझ्यावर वेगवेगळ्या दबंग लोकांनी दबाव आणला. या संदर्भात डीसीपी पासून राज्यपालांपर्यंत सगळ्यांकडे मी दाद मागितली. पण अद्याप कारवाई झाली नाही म्हणून विधानसभेत मी हा मुद्दा मांडतो आहे, असे गोयल म्हणाले.

    त्याचवेळी त्यांनी सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून राजकारण करू नये. कारण हा गंभीर मुद्दा आहे. मी जीवाच्या जोखमीने काम करतो आहे आणि जीवाची भीती असताना विधानसभेत नोटांच्या गड्ड्या आणून हा मुद्दा मांडला आहे. या संदर्भात सरकारने कारवाई करावी, असे आवाहन आमदार गोयल यांनी केले आहे.

    An Aam Aadmi Party MLA removed the piles of currency notes in the Delhi Assembly

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस