• Download App
    आपल्याच सुनेच्या चारित्र्याचा जी करते अपमान-ती विद्याहीन चव्हाण! ‘डान्सिंग डॉल’वर अमृता फडणवीसांचा पलटवार-ठोकला अब्रुनुकसानीचा दावा Amrita Fadnavis retaliates against 'Dancing Doll'

    आमने-सामने :आपल्याच सुनेच्या चारित्र्याचा जी करते अपमान-ती विद्याहीन चव्हाण! ‘डान्सिंग डॉल’वर अमृता फडणवीसांचा पलटवार-ठोकला अब्रुनुकसानीचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबईः रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया याचा निषेध नोंदवताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृतांना मध्ये ओढत त्यांना डान्सिंग डॉल असे संबोधले होते .त्यामुळे सर्वच स्तरातून या वक्तव्याचा निषेध करण्यात आला .आता अमृता फडणवीस यांनी आज विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत निर्वाणीचा इशाराही दिलाय. Amrita Fadnavis retaliates against ‘Dancing Doll’

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण काय म्हणाल्या –

    भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले, असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावे वाटते.

     

    यावर अमृता फडणवीस यांचे उत्तर-

    अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना पाठविलेली नोटीस ट्वीट केली आहे. त्यावर एक सणसणीत प्रतिक्रियाही दिली आहे.

    आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! @Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण !

    यावर परत विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे…

    अमृता फडणवीस काहीही करू शकतात. त्यांनी काय करावे, काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी मिसेस फडणवीसांबद्दल काहीही वाईट बोलले नाही. माफी मागण्याचे काहीही कारण नाही. खरे तर भाजपवाल्यांना माझ्या घरात नाकं खुपसण्याचं गरज नाही. त्यावर कोर्टाचा निर्णय झालाय. मी सुनेला छळलंय, असं त्या कसं म्हणू शकतात. याचा त्यांनी काही पुरावा द्यावा. चांगली काम करणाऱ्यांची बदनामी सुरू आहे. आता हा वाद कुठपर्यंत जाणार हे पाहणे महत्वाचे ठरेल .

    Amrita Fadnavis retaliates against ‘Dancing Doll’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !