रुग्णालयात खासदार नवनीत राणा यांनी जाऊन घटनेची माहिती घेत नातेवाईकांचे सांत्वन केले.Amravati: The bodies will not be picked up from the district hospital till action is taken against the culprits; Relatives took the offensive holy
विशेष प्रतिनिधी
अमरावती : भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्या पोटे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आज गेटचे कलरिंग करताना चार कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागूण मृत्यू झाला आहे.मात्र घटनेला चार तास उलटूनही कॉलेजच्या वतीने कोणीही मृतदेह पहायला आले नाही.
तसेच नातेवाईकांचेदेखील सांत्वन करायला कोणी आलं नाही. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी अमरावती जिल्हा रुग्णालयात कॉलेज प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.दरम्यान रुग्णालयात खासदार नवनीत राणा यांनी जाऊन घटनेची माहिती घेत नातेवाईकांचे सांत्वन केले.
तसेच नातेवाईकांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी.तसेच दोषींवर कारवाई करण्याची यावी. मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावी या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातून उचलणार नाही व शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.आता या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून तणाव निर्माण झाला आहे.
Amravati: The bodies will not be picked up from the district hospital till action is taken against the culprits; Relatives took the offensive holy
महत्त्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये सरसकट पेट्रोल स्वस्त नव्हे, तर गरीब आणि मध्यमवर्गीयांना १० लिटरपर्यंतच एका लिटरमागे २५ रुपयांची सबसिडी!!
- बहुमतातले सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का? ; संजय राऊत यांचा सुधीर मुनगंटीवार यांना सवाल
- PM Kisan : नवीन वर्षात पंतप्रधान मोदी देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 20 हजार कोटी रुपये
- लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करतय – प्रसाद लाड