• Download App
    अमरावतीची बाजारपेठ आठ दिवसांनी उघडली ; संचारबंदी शिथील केल्याने व्यापाऱ्यांना दिलासाAmravati Market Opened eight days later

    अमरावतीची बाजारपेठ आठ दिवसांनी उघडली ; संचारबंदी शिथील केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : अमरावतीमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरांमध्ये संचारबंदीचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले होते. मात्र आता आठ दिवसानंतर या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाली आहे. आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत सुरु होण्यास प्रारंभ झाला आहे.
    Amravati Market Opened eight days later

    संपूर्ण शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली आहे, हिंसाचारामुळे आठशे ते हजार कोटीचे शहरातील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून आता शहरातील परिस्थिती पूर्ववत येत आहे. सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात संचारबंदी कायम राहणार आहे.

    – अमरावतीची बाजारपेठ आठ दिवसांनी उघडली

    – संचारबंदीमध्ये काही तासांची शिथिलता

    – सायंकाळी ६ पर्यंत बाजारपेठ उघडण्यासाठी मुभा

    – शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली

    Amravati Market Opened eight days later

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू