Anjali Damania : धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत, पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
धनंजय मुंडे यांना सत्यमेव जयते असे म्हणणे शोभत नाही. ते कोणत्याही अंगाने क्लिन अर्थात स्वच्छ नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.