CM Fadnavis : सीएम फडणवीस म्हणाले- आमच्या तिघांमध्ये आता स्पीड ब्रेकरला जागा नाही; महामुंबई मेट्रो 9चा चाचणी टप्पा पूर्ण
आता मी तिघे एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्यामध्ये कोणीही स्पीडब्रेकर आणू शकत नाही. कोणाला बुस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. मात्र स्पीड ब्रेकरला आता आमच्यात जागा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महामुंबई मेट्रो 9 चा चाचणी टप्पा आज पूर्ण झाला. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.