Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित सुमारे ५० कंपन्यांवर आणि ३५ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) २४ जुलै रोजी मोठी कारवाई केली. ही कारवाई मुंबई आणि दिल्लीतील विविध ठिकाणी करण्यात आली असून, यामागे ३००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप आहे.