Prithviraj Chavan : निवडणूक आयोगाच्या यादीवर आता काँग्रेसचा ‘वॉच’; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर आता काँग्रेस पक्षाचा वतीने वॉच ठेवण्यात आले आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर केलेल्या आरोप संदर्भातले पुरावे शोधले जाणार आहेत.