Prakash Ambedkar : शरद पवारांचा दावा म्हणजे वरातीमागून घोडे; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका
शरद पवारांनी 160 जागांसंदर्भात केलेला दावा हा वराती पाठीमागून घोडे असल्यासारखे आहे. आम्ही यापूर्वी सगळ्या पक्षांना कोर्टात जाण्याचे आवाहन केले होते, पण तेव्हा कोणीही सोबत आले नाही. आता फक्त बोंबलत बसले आहेत. किती खोटे बोलावे, यालाही एक सीमा असते,” अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘मंडल यात्रे’वर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.