दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यांत उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!
दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यात उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!, असला प्रकारात बारामतीत घडला. हुल गांधींच्या मतांच्या चोरीच्या आरोपांना वेगळे वळण देण्यासाठी शरद पवारांनी दोन लोक आपल्याला भेटल्याची स्टोरी माध्यमांना सांगितली होती, पण त्या संदर्भात निवडणूक आयोग आपल्याकडे पुरावे आणि तक्रारीची मागणी करेल हे लक्षात येताच खुद्द पवारांनी नंतर तो विषय “गुंडाळून” टाकला. महाराष्ट्रातील त्यावरची चर्चा देखील त्यांनी “आपल्या पद्धतीने” थांबवली. परंतु, बारामतीत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी फक्त दोन वाक्यांमध्ये उत्तर देऊन त्यांनी देखील हात वर केले.