Laxman Hake : मराठा तेवढा मेळवावा,ओबीसी मुळासकट संपवावा … जरांगेंच्या मागणीवर प्रतिआंदोलनाचा लक्ष्मण हाके यांचा इशारा
यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना हाके म्हणाले, मराठा तेवढा मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा, असाच मनाेज जरांगेंच्या मागणीला अर्थ होतो. ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन पुकारतील शासनाने त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली पाहिजे, नाही तर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.