Eknath Shinde : शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणार असे सांगितले होते; जरांगेंच्या उपोषणानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
महायुती सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात आजचा निर्णय हा देखील मोठा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी याआधी जाहीर सभेत शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार एसईबीसीमधून दिले होते. ते टिकवले देखील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.