पत्रकार परिषदेत अजितदादांकडून स्वतःच्याच माणसांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल; महेश लांडगेंची सोशल मीडियावर पोस्ट!!
पिंपरी चिंचवड मधील भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढायच्या नादात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्वतःच्याच माणसांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन स्थानिक भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे खाल्ले. अगदी कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खाल्ले, असा आरोप त्यांनी केला.