Sharad Pawar : शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना- राज्य पातळीवर बोलताना जातिवाचक बोलू नका; संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा निषेध
महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले आहे. तसेच यावेळी धर्मनिरपेक्षता जपण्याचे आवाहनही शरद पवारांनी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.