• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Chhagan Bhujbal, : ओबीसींचा कोर्टात अन् राजकारणातही विजय होईल; छगन भुजबळांनी व्यक्त केला ठाम विश्वास

    राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत ओबीसींचा कोर्टात अन् राजकारणातही विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्य एक ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला.

    Read more

    पश्चिम महाराष्ट्रातल्या स्वबळाची शिंदे सेनेकडून चाचपणी; शासनाच्या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्यावर भर!!

    महाराष्ट्रात महायुती सत्तेवर असली तरी पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवायची वेळ आली, तर कोणत्या प्रकारची रणनीती आखावी लागेल??, याची चाचपणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी आज केली.

    Read more

    वसुबारसेचे अनोखे सवत्सधेनु पूजन; गोवंश संरक्षणाचा वाकळवाडी ग्रामपंचायतीचा ठराव!!

    वसुबारस या पवित्र सणाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकळवाडी येथे आयोजित विशेष ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

    Read more

    पवार + काँग्रेस साजरी करायला सांगताहेत काळी दिवाळी; ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर केली फटक्यांची आतषबाजी; याला म्हणतात, महाविकास आघाडी!!

    : पवार + काँग्रेस साजरी करायला सांगताहेत काळी दिवाळी; ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर केली फटक्यांची आतषबाजी

    Read more

    सृष्टीच्या पोषणाचा विचार योगशास्त्रात; विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांच्या विरोधात नाही!!

    भौतिक प्रगतीच्या नावाखाली मानवाने निसर्गाची अपरिमीत हानी केली आहे. शाश्वत विकासासाठी मनुष्याबरोबरच निसर्गाच्या उन्नतीचा मार्ग गरजेचा आहे. सृष्टीच्या पोषणाचा हा विचार योगशास्त्रात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. निसर्गासोबत शाश्वत जगण्याचा मार्ग हा भारताकडेच असून, विश्वकल्याणासाठी तो आपल्याला प्रशस्त करायचा आहे, असेही ते म्हणाले.

    Read more

    Manoj Jarange : भुजबळ वातावरण खराब करत आहेत, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि मराठ्यांना देणार, मनोज जरांगेंचा पलटवार

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेवर तीव्र आक्षेप घेत, ती ओबीसीची नव्हे, तर जिल्ह्यावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतलेली आणि मराठ्यांच्या राजकीय अस्तित्वावर घाला घालणारी सभा असल्याचे म्हटले आहे.

    Read more

    Gopichand Padalkar : आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय; ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी संघटित होण्याची गरज- गोपीचंद पडळकर

    ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित होते.

    Read more

    Lakshman Hake : बीडमध्ये ओबीसी नेत्यांचा महाएल्गार! छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सभा, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; चौथी नापास म्हणत जरांगेंना डिवचले

    ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज, 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सभेच्या आधी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्यात हॉटेल सनराईज येथे बैठक झाली.

    Read more

    Dhananjay Munde : एका व्यक्तीने जाती-जातीत भांडणे लावली:माणसात माणूस राहिला नाही, महाएल्गार सभेतून धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर टीका

    ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज, 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा पार पडली. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार भाषण केले.

    Read more

    Chhagan Bhujbal : विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला; महाएल्गार सभेतून छगन भुजबळांचा हल्लाबोल

    विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या महाएल्गार सभेत बोलताना केली आहे. तसेच विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेंकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे आहे की तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.

    Read more

    ज्या जिल्ह्यात जाऊन पवार टाकायचे “डाव”, तिथे जाऊन फडणवीसांची “खेळी”; राष्ट्रवादी झाली “खाली”!!

    ज्या जिल्ह्यात जाऊन पवार टाकायचे डाव, तिथे जाऊन फडणवीसांची खेळी; राष्ट्रवादी झाली “खाली”!!, ही राजकीय घडामोडी सोलापूर जिल्ह्यातून समोर आली.

    Read more

    ठाकरे + पवारांनी आपले 13 खासदार लोणच्यासारखे मुरवत ठेवलेत का??

    उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत निवडून आणलेले आपले 13 खासदार लोणच्यासारखे मुरवत ठेवलेत का??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांच्या राजकीय वर्तनामुळे आली.

    Read more

    बारामतीत अजितदादांनी अनुभवला विविध क्रीडा स्पर्धांचा थरार; पण स्वतः खेळले कॅरम!!

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत अनुभवला विविध क्रीडा स्पर्धांचा थरार आणि स्वतः खेळले काय तर कॅरम!!, हा प्रकार आज समोर आला.

    Read more

    कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला, घराघरात शिवसेना पोहोचवा; रत्नागिरीतून एकनाथ शिंदेंचे आवाहन; उद्धव सेनेवर प्रहार, पण भाजपला आव्हान

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर घराघरामध्ये शिवसेना पोहोचवा, महायुतीच्या योजना जनतेपर्यंत न्या

    Read more

    काँग्रेसचे विरोधकांबरोबर जाऊन निवडणूक आयोगापुढे रडगाणे; पण काँग्रेसचे 13 + 1 खासदार काय गवत उपटताहेत??

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होण्याअगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांबरोबर निवडणूक आयोगाकडे जाऊन रडगाणे गायले.

    Read more

    Babanrao Taywade : सरकारच्या GRनंतर कुणबीचे केवळ 27 दाखले जारी; बबनराव तायवाडेंनी दिली आकडेवारी; जरांगेंना धक्का!

    2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. तायवाडे यांच्या मते, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत फक्त 73 अर्ज प्राप्त झाले, आणि त्यापैकी फक्त 27 अर्ज मंजूर झाले आहेत. बबनराव तायवाडेंनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांना जोरदार धक्का बसणार आहे.

    Read more

    Gunratna Sadavarte : मुंबई ST बँकेतील हाणामारीवर गुणरत्न सदावर्ते संतप्त; आदिवासी महिलेला बेअब्रू करण्याचा आरोप

    मुंबई एसटी बँकेतील बैठकीत झालेल्या राड्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या संचालकांवर बैठकीला उपस्थित आदिवासी महिलांना कथितपणे बेअब्रू करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदावर्ते यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाची दाहकता वाढली आहे.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवारांचा दावा- महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी खोट्या मतदारांची नोंदणी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे आधार कार्ड!

    महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मतदार यादी तसेच मतचोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. यावेळी प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी स्क्रीनवर मतदारांची खोटी नावे टाकण्यात आल्याचे सांगत थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या नावे देखील आधार कार्ड असल्याचे दाखवले.

    Read more

    अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले- कुणी मिमिक्री केल्याने अंगाला भोकं पडत नाहीत, मी काम करणारा माणूस!

    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मिमिक्री’द्वारे केलेली टीका धुडकवून लावली आहे. कुणी माझी मिमिक्री केल्यामुळे माझ्या अंगाला भोकं पडत नाही.

    Read more

    नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले; एकनाथ शिंदेंचा उद्धव सेनेवर निशाणा

    नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेवर निशाणा साधला. शिवसेना सातारा जिल्हा शाखेच्या वतीने शहरातील जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित राहून मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

    Read more

    सरकार आपल्या दारी ते शिवसेना घेऊन आली योजनांची शिदोरी, इथपर्यंत आलाय राजकीय प्रवास!!

    सरकार आपल्या दारी ते शिवसेना घेऊन आली योजनांची शिदोरी, इथपर्यंत महायुतीचा राजकीय प्रवास झाल्याचे आज समोर आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकार आपल्या दारी योजनेची अंमलबजावणी करून महायुती सरकारने मतदारांचा विश्वास जिंकला होता. त्या योजनेचा संपूर्ण महायुतीला राजकीय फायदा देखील झाला होता.

    Read more

    Commonwealth : 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादेत होणार; कार्यकारी मंडळाची शिफारस

    कॉमनवेल्थ गेम्स क्रीडा कार्यकारी मंडळाने २०३० च्या कॉमनवेल्थ गेम्स (CWG) चे यजमानपदासाठी अहमदाबादला नामांकन दिले आहे. २६ नोव्हेंबर रोजी ग्लासगो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.

    Read more

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे सेनेची सूत्रे श्रीकांत शिंदेंकडे; विभागवार बैठकांमध्ये पुढाकार

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पक्ष संघटनेची रचना जरी मूळच्या शिवसेनेच्या धर्तीवर असली तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सूत्रे मात्र त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविल्याची चिन्हे दिसली आहेत.

    Read more

    Maharashtra Government : शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपये अनुदान; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती

    शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या संदर्भात माहिती देताना भरणे म्हणाले, जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषि विभागामार्फत आयोजन केले जाते, अशी माहिती भरणे यांनी दिली आहे.

    Read more