Ramdas Athawale : ऑनरकिलिंगचा बळी विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबियांची रामदास आठवले भेट घेणार
मराठा मुलीशी विवाह केल्यामुळे दलित तरुण विक्रम गायकवाड यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. शनिवारी (दि.22 फेब्रुवारी,) भोर तालुक्यातील उत्रोली या गावात भेट देऊन ऑनरकिलिंग चा बळी ठरलेल्या दिवंगत विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबियांची आपण सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.