Monsoon : अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल; 12 दिवस आधीच आगमन, हवामान विभागाची अधिकृत घोषणा
राज्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे