भाजपने संयमी भाषेत दिलेला इशारा अजितदादांना समजेल, रुचेल, पचेल आणि पुरेल का??
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवरच दुगाण्या झोडल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्यांनी आपल्या सोयीचे राजकारण साधून घेतले.