विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amol Mitkari विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठे यश मिळाले. मात्र, या विजयाच्या श्रेयवादावरून पक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते यांच्यात सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल अजित पवारांसाठी कँपेनिंग करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांचे अभिनंदन केले. अजित पवारांचे अभिनंदन करताना नरेश अरोरा यांनी दादांच्या खांद्यावर हात ठेवला. पण ही गोष्ट अमोल मिटकरी यांना खटकली. अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? असा सवाल करत अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांना सुनावले.Amol Mitkari
नेमके प्रकरण काय?
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यासाठी डिझाईन बॉक्स या पीआर कंपनीने कँपेनिंग केले. नरेश अरोरा या कंपनीचे प्रमुख आहेत. विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर अन्य कार्यकर्त्यांप्रमाणे नरेश अरोरा यांनी अजित पवारांचे अभिनंदन केले. मात्र, अभिनंदनावेळी अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवला होता. यावरून अमोल मिटकरी संतापले.
अजित पवारांच्या निवडणुकीतील यशामागे डिझाईन बॉक्स पीआर कंपनीचा हात असल्याची चर्चा आहे. त्यावर अमोल मिटकर यांनी आक्षेप घेत, हे सगळे खोटे असल्याचे ते म्हणाले. डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी फुकटात काम करायला आली नव्हती. एकनाथ शिंदे यांच्यासाहेबतही अशाप्रकारच्या तीन एजन्सी होत्या. त्यांच्या पक्षाला 51 जागा मिळाल्या आहेत. पण कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची? असा सवालही अमोल मिटकरी यांनी केला. तो दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. आता भारतातील इतर ठिकाणच्या निवडणुका आहेत. आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी या पीआर एजन्सीने स्वतःला लाँच करण्याचा प्रयत्न केला. विजयाचे श्रेय आपल्याकडे घेतले, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. अरोराने यशाचे श्रेय घेण्याचा काही संबंध नाही. पक्षाने त्याला शो कॉज नोटीस पाठवली पाहिजे, असेही मिटकरी म्हणाले. त्यानंतर अमोल मिटकरींनी आपली पोस्ट देखील डिलीट केल्याचे सांगितले.
पक्ष आणि अमोल मिटकरी यांच्यात सोशल वॉर
अमोल मिटकरी यांची डिझाईनबॉक्स्ड संदर्भातील वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही, असे पक्षाच्या अधिकृत हँडलवर ट्वीट करत पीआर कंपनीने अमोल मिटकरी यांना आणखी डिवचले. त्यावर हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का..? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे. आमचा साधा प्रश्न आहे, अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे चंदिगड नाही. चुक कबूल करा, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला.
Amol Mitkari was angry, saying – How did Naresh Arora dare to put his hand on Dada’s shoulder?
महत्वाच्या बातम्या
- Eknath shinde एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या वळणावर, की परस्पर माध्यमांनीच बातम्यांचे पतंग हवेत उडविले उंचावर?
- Sambhal case : संभल प्रकरणी मोठी कारवाई, सपा खासदार अन् आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल
- Andaman waters : मोठी बातमी! अंदमानच्या पाण्यात तब्बल 5 टन ड्रग्ज जप्त
- Ajit pawar बरं झालं अजितदादा आधीच सत्तेच्या वळचणीला आले, नाही तर तुतारी मार्गे बाराच्याच भावात गेले असते!!