विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amol Mitkari सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचे परखड शब्दांत समर्थन केले आहे. पार्थदादा पवार यांचे विधान काँग्रेसला फारच झोंबले आहे. यामुळेच काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू सुरू असल्याच्या त्यांच्या विधानानंतर एरवी डबक्यात लपून बसलेली बेडके बाहेर पडून एकदम डऱ्याव डऱ्यावर करत आहेत, असे ते म्हणालेत.Amol Mitkari
पार्थ पवार यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधताना राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका करत ते एक कृतघ्न मुलगा असल्याचा आरोप केला होता. विशेषतः शरद पवार, सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी पार्थ पवारांचे कान टोचले होते. यामुळे पार्थ पवार यांच्या राजकीय परिपक्वतेविषयी संशय व्यक्त केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे.Amol Mitkari
पार्थदादा!, तुम्ही अगदी खरं बोललेत
अमोल मिटकरी यासंबंधी म्हणाले, पार्थदादा, u are absolutely right !…. आमच्या पक्षाचे नेते खासदार पार्थदादा पवार यांचं वक्तव्य काँग्रेसला फारच झोंबलेलं दिसतंय. काँग्रेसचा ‘डाऊनफॉल’ सुरू असल्याच्या पार्थदादांच्या वक्तव्यावर एरव्ही डबक्यात लपून बसलेली बेंडकं बाहेर पडत एकदम ‘डऱ्याव-डऱ्याव’ करत बोंबलायला लागलीत. कधीकाळी राज्यात सत्ताधारी असलेली काँग्रेस आज विधानसभेत १६ च्या आकड्यावर थांबलीय. १६ हा आकडा नेहमीच धोक्याचा असतो, असं जाणकारांना माहित आहे. त्यामुळेच पार्थ दादांनी असं वक्तव्य केलेलं असावं.
मात्र, आपलं वर्तमान आणि अस्तित्व गमावलेल्या अन विसरलेल्या काँग्रेसला आता इतिहासाचाही अभ्यास करावा लागेल हे नक्कीच. पार्थदादा!, तुम्ही अगदी खरं बोललेत. काँग्रेसचा ‘डाऊन फॉल’च सुरू आहे. जाहीर समर्थन, असे ते म्हणालेत.
सूरज चव्हाणांनीही केले समर्थन
तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनीही या प्रकरणी काँग्रेसवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, काँग्रेसने आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केले ते अगोदर पाहावे. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती पोटनिवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण काँग्रेसने ती परंपरा पाळली नाही. काँग्रेसने राजकीय परंपरेला छेद देण्याचे काम केले. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्राची जनभावना आहे. पण या जनभावनेपासून दूर गेलेली काँग्रेस ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.
काँग्रेसच्या या भूमिकेचा दाखला देत पार्थ पवारांनी काँग्रेसचे डाऊनफॉल सुरू होईल असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. काँग्रेसने आमच्या नेत्यांवर पुन्हा अशी टीका केली तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.
“Parth Dada is Right”: Amol Mitkari Backs Parth Pawar Amid Congress Downfall Row
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला मिळणार स्वतंत्र AI विभाग; फडणवीस सरकार स्थापन करणार नवे आयुक्तालय!!
- पार्थचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!
- महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना, भांडवली बाजारात सूचीबद्धतेचा फडणवीस सरकारचा निर्णय
- Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना फटकारले; तपास NIA कडे