विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व नथुराम गोडसे बद्दलचे विचार सर्वांना माहित आहेत. परंतु डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करून गांधी हत्येचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. डॉ. कोल्हे आता कितीही सारवासारव करत असले तरी त्याला काहीही अर्थ नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. Amol Kolhen’s one-sided support for the assassination of Gandhi, Statement by Nana Patole
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पटोले म्हणाले की, गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न एका विशिष्ट वर्गाकडून सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारकऱ्याचे उदात्तिकरण कदापी खपवून घेणार नाही,
डॉ. अमोल कोल्हे कलाकार असले तरी ते एका पक्षाचे खासदार आहेत त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे. कलाकार म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि नथुरामचे उदात्तीकरण करणे हे दुर्दैवी आहे.
नथुराम गोडसेला नायक बनवण्याचा हा प्रयत्न चुकीचा पायंडा पाडणारा आहे. याआधीही काही कलाकारांनी गोडसेच्या भूमिका केल्या त्यावरही लोकांनी तीव्र नापसंती व संताप व्यक्त केला होता. डॉ. कोल्हे नथुरामची भूमिका करण्याबद्दल देत असलेले स्पष्टीकरण अत्यंत तकलादू व न पटणारे आहे.
Amol Kolhen’s one-sided support for the assassination of Gandhi, Statement by Nana Patole
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र चेंबर पत्रिके’चे प्रकाशन
- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियंका गांधीच स्वतः च्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा
- Pune Train Derail : पुणे स्टेशनवर अपघात, डेमू रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, सोलापूर ते मुंबई मार्गावर परिणाम
- गुगलसह वेबसाइट मालकांनाही मोठा झटका, युरोपमध्ये गुगल अॅनालिटिक्सचा वापर ठरला बेकायदेशीर, वापरल्यास कोट्यवधींचा दंड