• Download App
    "राष्ट्रीय" अध्यक्षांचे 4 जागांवरच समाधान; कोल्हेंकडून अजितदादांचे वस्त्रहरण; पण "साहेबांकडे" तरी किती वस्त्रे शिल्लक?? Amol Kohle targets ajit pawar over minimal seats in loksabha, his sharad pawar NCP has reduced to 10 out of 48!!

    “राष्ट्रीय” अध्यक्षांचे 4 जागांवरच समाधान; कोल्हेंकडून अजितदादांचे वस्त्रहरण; पण “साहेबांकडे” तरी किती वस्त्रे शिल्लक??

    नाशिक : एका पक्षाच्या “राष्ट्रीय” अध्यक्षाला महाराष्ट्रात लोकसभेच्या फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले, यातूनच त्यांची राजकीय परिस्थिती काय आहे??, ते आपण समजावून घ्यावे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले. Amol Kohle targets ajit pawar over minimal seats in loksabha, his sharad pawar NCP has reduced to 10 out of 48!!

    इतकेच नाही, तर त्या राष्ट्रीय अध्यक्षांना 4 जागांपैकी एका जागेवर पत्नीला उमेदवारी द्यावी लागली आणि दुसऱ्या एका जागेवर प्रदेशाध्यक्ष उभे राहिले. उरलेले दोन उमेदवार आयात करावे लागतात, अशा शब्दांमध्ये देखील अमोल कोल्हे यांनी अजितदादांना टोचले. अमोल कोल्हे यांनी अजितदारांच्या राष्ट्रवादीचे वस्त्रहरण केले.

    अमोल कोल्हे यांनी अजितदादांना टोचलेले वक्तव्य अक्षरशः खरे आहे. अजित पवारांना त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीत भाजपच्या दबावामुळे उमेदवारी देऊन उभे करावे लागले आहे. रायगडातून सुनील तटकरे यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. धाराशिव मधून राणा जगजीत सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटलांनाच उमेदवारी द्यावी लागली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे केलेले वस्त्रहरण अक्षरशः खरे आहे, पण दस्तूर खुद्द अमोल कोल्हे ज्या पक्षातून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत, त्या पक्षाच्या “साहेबांची” म्हणजेच पर्यायाने अमोल कोल्हेंच्या “साहेबांची” नेमकी राजकीय अवस्था काय आहे??

    *… तर अमोल कोल्हे यांचे “साहेब” गेली 4 दशके देशात “राष्ट्रीय” पातळीवरचे नेते म्हणून वावरले आहेत. दिल्लीत “स्ट्रॉंग मराठा” म्हणून त्यांची मराठी माध्यमांनी प्रतिमा निर्मिती केली आहे, पण प्रत्यक्षात अमोल कोल्हेंच्या “साहेबांच्या” नेतृत्वाखालच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने केव्हाच त्यांचा “राष्ट्रीय” दर्जा गमावून
    “प्रादेशिक” पक्षाचा दर्जा अमोल कोल्हेंच्या “साहेबांच्या” पक्षाला स्वीकारावा लागला आहे.*

    इतकेच नाही तर अमोल कोल्हे यांच्या “साहेबांचा” पक्ष काँग्रेस बरोबर आघाडीत असताना महाराष्ट्रात 48 पैकी लोकसभेच्या किमान 20 ते 22 जागा लढवत असे. म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रावर प्रभाव राखून असे, पण आता अमोल कोल्हे यांच्या “साहेबांचा” “ब्रँड” एवढा छोटा झाला आहे की, महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षांमधल्या क्रमांकात “साहेबांचा” पक्ष तिसऱ्या स्थानावर आला आहे आणि “साहेबांच्या” पक्षाला शिवसेना आणि काँग्रेस या दोन मित्र पक्षांनी महाराष्ट्रातल्या 48 पैकी “तब्बल” 10 जागा बहाल केले आहेत. पण त्या 10 जागांवरही अमोल कोल्हे यांच्या “साहेबांना” एका झटक्यात उमेदवार यादी जाहीर करता आली नाही. तिथे उमेदवाऱ्या जाहीर करताना त्यांना 5 – 3 – 2 असे पत्ते पिसावे लागले. माढा मतदारसंघात त्यांना मोहिते पाटलांसारख्या जुन्याच अनुयायांना आपल्या पक्षात खेचून आणावे लागले. साताऱ्याची उमेदवारी शौचालय घोटाळ्यात अडकलेल्या नेत्याला द्यावी लागली.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेल्या 10 जागांपैकी बारामतीत त्यांची मुलगी उभी आहे आणि अमोल कोल्हे यांना “साहेबांनी” शिरूरच्या जागेवरून उभे केले आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी जरी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे केलेले राजकीय वस्त्रहरण खरे असले, तरी खुद्द अमोल कोल्हेंच्या “साहेबांच्या” पक्षाच्या अंगावर तरी किती भरजरी राजकीय वस्त्रे शिल्लक आहेत??, हे अमोल कोल्हे एकदा स्वतःच्या किंवा “साहेबांच्या” आरशात पाहणार आहेत का??

    Amol Kohle targets ajit pawar over minimal seats in loksabha, his sharad pawar NCP has reduced to 10 out of 48!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस