• Download App
    बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची पान मसाल्याच्या जाहिरातीतून माघार |Amitabh Bacchan rejects panmasala advt.

    बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची पान मसाल्याच्या जाहिरातीतून माघार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एका पान मसाल्यासमवेतचा करार रद्द करत यापुढे अशा प्रकारची जाहिरात करणार नाही, असे जाहीर केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या अधिकृत ब्लॉगवर त्यांच्या कार्यालयाच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की,Amitabh Bacchan rejects panmasala advt.

    एका पान मसाल्याची जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी संबंधित ब्रँडशी संपर्क साधला आणि हा करार थांबवत असल्याचे सांगितले. यानुसार संबंधित ब्रँडबरोबरचा करार रद्द केला असून प्रमोशन फिस देखील परत केली आहे.



    कराराच्या वेळी संबंधित जाहिरात ही ‘सरोगेट ॲड’असल्याचे ठाऊक नव्हते, असे ब्लॉगवर म्हटले आहे.काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन हे रणवीर सिंह बरोबर पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसले. शाहरुख खान, अजय देवगण यांच्याप्रमाणेच पान मसाल्याची जाहिरात केल्यानंतर बीग बींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

    Amitabh Bacchan rejects panmasala advt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस