• Download App
    अनंत चतुर्दशीनंतर अमित ठाकरेंची समुद्र किनारे स्वच्छता मोहीम Amit Thackeray's beach cleaning campaign after Anant Chaturdashi

    अनंत चतुर्दशीनंतर अमित ठाकरेंची समुद्र किनारे स्वच्छता मोहीम

    प्रतिनिधी

    मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई आणि कोकणातील हजारो सार्वजनिक मंडळ तसंच गणेशभक्त मोठ्या भक्तिभावाने समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करतात, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांपैकी अनेक मूर्त्या आणि मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावर येऊन वाळूत रुततात. आपल्या लाडक्या गणरायाच्या मूर्तीचे भग्नावशेष पाहून सर्वजण हळहळ व्यक्त करतात. यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे अनंत चतुर्दशीच्या पुढच्या दिवशी म्हणजेच शनिवार १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० या दोन तासांत “आपले समुद्र किनारे आपली जबाबदारी” ही मोहीम राबवणार आहेत. Amit Thackeray’s beach cleaning campaign after Anant Chaturdashi

    मुंबई कोकणात समुद्र स्वच्छता मोहीम

    मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १३ समुद्र किनाऱ्यांवर ही मोहीम राबवण्यात येणार असून त्यात मनसेचे शेकडो कार्यकर्ते तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

    निर्माल्य महापालिकेला सोपवणार

    मुंबईमध्ये गिरगांव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या समुद्र किनाऱ्यांवर, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड या समुद्र किनाऱ्यांवर तर रत्नागिरीत मांडवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविणार आहे. स्वतः अमित ठाकरे दादर समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहेत. मनसेचे पदाधिकारी समुद्र किनाऱ्यांवर वाळूत रुतलेल्या गणेश मूर्तींचे अवशेष तसेच निर्माल्य गोळा करून ते महापालिका प्रशासनाकडे सोपवणार आहेत. गेल्या वर्षी ११ डिसेंबर २०२१ रोजी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने कोकणातील ४० समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम केली होती.

    Amit Thackeray’s beach cleaning campaign after Anant Chaturdashi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!