- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. Amit Shah’s Pune tour; Darshan of Dagdusheth Ganapati
विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शनिवारी पुण्यात दाखल झाले. आज, रविवारी दिवसभर शहा महापालिकेसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.दरम्यान आज सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
त्यानंतर दगडूशेठ गणपतीचा महाअभिषेक करण्यात आला.महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.गणरायाला अभिषेक झाल्यानंतर अमित शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.
अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो.आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो.असे मागणे अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले.यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Amit Shah’s Pune tour; Darshan of Dagdusheth Ganapati
महत्त्वाच्या बातम्या
- जळगावमध्ये बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत गुलाबराव पाटलांनी खडसेंवर साधला निशाणा ; म्हणाले – ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’
- पंजाब : भारत-पाकिस्तान सीमेलगत सीमा सुरक्षा दलाने ड्रोनवर केला गोळीबार
- Surrogacy Bill : लोकसभेत संमत; नॅशनल सरोगसी बोर्ड आणि राज्य सरोगसी बोर्ड स्थापन;कमर्शियल सरोगसीला चाप
- दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये हुडहुडी; हिमाचल, काश्मिरमध्ये बर्फवृष्टीने गारवाच गारवा
- सातारा : पोवईनाक्यावर डांबराच्या ट्रकने अचानक घेतला पेट