• Download App
    Amit Shah संघ स्तुतीनंतर पवारांच्या प्रेमाचा "उमाळा"; अमित शाहांनी एका वाक्यात ढासळवला!!

    Amit Shah संघ स्तुतीनंतर पवारांच्या प्रेमाचा “उमाळा”; अमित शाहांनी एका वाक्यात ढासळवला!!

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्तुती केल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना पवारांच्या प्रेमाचा आलेला “उमाळा” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल एका वाक्यात ढासळवला. महाराष्ट्रातल्या मतदारांनी पवारांच्या दगाफटक्याचे राजकारण जमिनीत 20 फूट गाडले, असे अमित शाह म्हणाले. त्यानंतर संजय राऊत प्रशांत जगताप वगैरे नेत्यांचा महाराष्ट्राचा “स्वाभिमान” एकदम उफाळला. पण त्याने आता महाराष्ट्र भाजपला काही फरक पडणार नाही.

    शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये संघाची थोडक्यामध्ये स्तुती केली होती, पण ती संघाच्या हिंदुत्व विचार प्रणालीची स्तुती नव्हती, तर संघाच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीची होती. संघाने शिस्तीने कार्य करून भाजपला महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी मदत केली. त्यांनी योग्य नियोजन केले आणि ते अमलात आणले. तसे कार्यकर्ते वचनाबद्ध आपल्याला हवे आहेत, असे पवार म्हणाले.

    पवारांच्या या संघ स्तुतीमुळे महाराष्ट्रातले काही भाजपचे नेते हुरळले होते. त्यात काही प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचाही समावेश होता. या दोघांनीही शरद पवारांना “चाणाक्ष” नेते म्हणून संबोधले होते. पवार संघ स्तुतीमुळे माध्यमांच्या चर्चेच्या पुन्हा केंद्रस्थानी आले होते. पवार आणि भाजप एकत्र येणार महिनाभरात काहीतरी पॅचअप होणार वगैरे बातम्यांच्या पुड्या पवार कॅम्पमधून सुटल्या होत्या. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील त्या बातम्यांना हवा दिली होती. त्यामुळे पवार आणि भाजप एकत्रीकरणाची वातावरण निर्मिती माध्यमे करू शकली होती.

    पण पवारांनी भाजप बरोबर येणे म्हणजे नेमके काय??, याचा धोका अमित शाह यांनी बरोबर ओळखला. पवारांसारख्या “अँटी मिडास टच” नेत्याला भाजप बरोबर घेणे म्हणजे पक्षाचे संघटनात्मक पातळीवर लाँग टर्म नुकसान करून घेणे हे अमित शाह यांनी बरोबर ओळखले. तसाही अमित शाह यांना शरद पवारांची राजकीय वाटाघाटींचा 2019 पासून चा प्रत्यक्ष “अनुभव” होताच. पवार बोलतात एक आणि करतात दुसरे हे शाह यांनी प्रत्यक्षात “अनुभवले” होते. त्यामुळे पवारांच्या संघ स्तुतीला शाह यांच्यासारखे नेते भाळणार नव्हतेच. तसे ते भाळलेच नाहीत म्हणूनच शिर्डीच्या भाजपच्या महाअधिवेशनात अमित शाह यांनी पवारांना एका वाक्यात ठोकले आणि भाजपच्या नेत्यांना आलेला पवारांच्या प्रेमाचा उमाळा ढासळून टाकला.


    Ashish Shelar शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या..आशिष शेलार यांची टीका


    भटकती आत्मा

    2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणाले होते. त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट भाजप वर झाला. मोदींच्या टीकेमुळे पवारांना सहानुभूती मिळाली. त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला झाला आणि त्यांचे 8 खासदार निवडून आले, असे बोलले गेले होते. पण पण मोदींची टीका पवारांवरची टीका हा त्या निवडणुकीतल्या एकूण परफॉर्मन्सचा एक छोटा भाग होता, हे नंतर सिद्ध झाले. कारण मोदींनी पवारांवर टीका केल्याच्या एकमेव फॅक्टरमुळे जर पवारांचे 8 खासदार निवडून आले असतील, तर मग तो इम्पॅक्ट फक्त चारच महिन्यांत कसा उलटला आणि पवारांच्या फक्त 10 आमदार कसे निवडून येऊ शकले??, याचे समाधानकारक उत्तर पवार समर्थक विश्लेषक देऊ शकले नाहीत.

    त्यामुळे आता देखील अमित शाह यांनी केलेल्या टीकेनंतर पवारांना सहानुभूती मिळेल पवार पुन्हा सेंटर स्टेजला येतील आणि त्याचा परिणाम महापालिका जिल्हा परिषद यांच्या संस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल, अशा जी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी चालवली आहे, ती फोल ठरण्याची दाट शक्यता आहे. कारण अमित शाह यांच्या एकाच वाक्यातल्या टीकेचा लाभ घेण्यात एवढी ताकद देखील पवारांच्या पक्षाची उरलेली नाही.

    Amit Shah targets sharad pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस