विशेष प्रतिनिधी
शिर्डी : शरद पवारांचे 1978 पासूनचे दगा फटक्याचे राजकारण महाराष्ट्रातल्या मतदारांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 20 फूट जमिनीत गाडले, अशा प्रखर शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना मतदारांनी जागा दाखवून दिल्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राचे आभार मानले.
शिर्डी मध्ये भाजपच्या महाअधिवेशनाचा समारोप अमित शाह यांच्या भाषणाने झाला. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी नेत्यांची भाषणे या महाधिवेशनात झाली. या सगळ्यांनी महाराष्ट्रात दीड कोटी भाजप सदस्य बनविण्याचे टार्गेट कार्यकर्त्यांना दिले. त्याचबरोबर 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये 50% पेक्षा जास्त मतदानाचे बूथ विकसित करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
अधिवेशनाच्या समारोपात अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले.
अमित शाह म्हणाले :
तुमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर घेऊ शकले. अनेक कार्यकर्त्यांना आमदार आणि मंत्री बनायची संधी मिळाली. पण त्यापलीकडे जाऊन तुम्ही जे काम केले, त्यामुळे महाराष्ट्रातल्या मतदारांनी शरद पवारांचे 1978 पासूनचे दगा फटक्याचे राजकारण 20 फूट जमिनीत गाडले. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या मतदारांची आणि भाजपची गद्दारी केली होती. त्यांची जागा तुम्ही केलेल्या कामामुळेच मतदारांनी त्यांना दाखवून दिली.
विधानसभा निवडणुकीत भाजपला महाप्रचंड विजय तर मिळालाच, पण त्याचबरोबर खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याबरोबर आल्याने ते पक्ष देखील जिंकू शकले.
पुढच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी भाजप नेत्यांनी बूथ स्तरावर मजबुती करण्याचे काम करावे. केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. यातून जनतेचा विश्वास कमावला तर आपला विजय रथ असाच पुढे जाईल.
Amit shah target Sharad Pawar political maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Nitin Gadkari रस्ते अपघातात जीव वाचवणाऱ्यांना बक्षीस, सरकार देणार मोठी रक्कम!
- Sharad Pawar राष्ट्रवादीतली अस्वस्थता आणि गटबाजी सावरता येईना, पण पवारांची राज्यातल्या शांततेसाठी फडणवीसांशी फोनवरून चर्चा!!
- Gulabrao Patil म्हणून उध्दव ठाकरे घेत आहेत देवेंद्र फडणवीस यांची पप्पी… गुलाबराव पाटील यांचा भाजपला सूचक इशारा
- Ravindra Chavan रवींद्र चव्हाण भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच