• Download App
    फडणवीसांनी राजीनामा देण्याच्या चर्चांवर अमित शाहांनी दिला हा निर्णय! Amit Shah has given the decision on the discussion of Fadnavis resigning

    फडणवीसांनी राजीनामा देण्याच्या चर्चांवर अमित शाहांनी दिला हा निर्णय!

    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या निराशाजनक कामगिरीमुळे फडणवीस नाराज आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपची कामगिरी पाहून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्याबाबत अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. Amit Shah has given the decision on the discussion of Fadnavis resigning

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा न देण्यास सांगितले आहे आणि राज्य सरकारमध्ये काम करत राहण्यास सांगितले आहे. अमित शाह म्हणतात, “जर तुम्ही राजीनामा दिला तर त्याचा परिणाम भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होईल. त्यामुळे अद्याप राजीनामा देऊ नका. शपथविधीनंतर राजीनाम्याबाबत सविस्तर चर्चा करू.



    अमित शाह यांनी फडणवीस यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रात सुधारात्मक उपाय योजले पाहिजेत असे सांगितले. राज्यात भाजपसाठी काय करता येईल, यावर आराखडा तयार करा आणि काम सुरू ठेवा. असं अमित शाह यांनी फडणवीसांना म्हटलं आहे.

    लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भाजपची बैठक झाली. या बैठकीत नेत्यांनी पराभवासंदर्भात विचारमंथन केले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधून भाजपच्या पराभवाची कारणे सांगितली. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो अपप्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    Amit Shah has given the decision on the discussion of Fadnavis resigning

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा