• Download App
    साखर उद्योगाला खेळते भांडवल, कर्ज फेररचना, को जनरेशन संदर्भात केंद्र अनुकूल; अमित शाहांच्या बैठकीनंतर फडणवीसांची माहिती Amit shah assured full cooperation to cooperative sugar mills in maharashtra

    साखर उद्योगाला खेळते भांडवल, कर्ज फेररचना, को जनरेशन संदर्भात केंद्र अनुकूल; अमित शाहांच्या बैठकीनंतर फडणवीसांची माहिती

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील साखर उद्योगात खेळते भांडवल, कर्ज फेररचना, प्राप्तिकर आणि को जनरेशन संदर्भात केंद्र सरकार सकारात्मक भूमिकेतून मदत करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. Amit shah assured full cooperation to cooperative sugar mills in maharashtra

    केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री मा. अमितभाई शाह यांनी साखर उद्योगांना अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यापुढील अडचणींचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक आज नवी दिल्ली येथे घेतली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.


    अयोध्येतील राम मंदिरावर आता तारीख पे तारीख नाही, तर अमित शाहांनी दिली नेमकी तारीख!!


    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार सुजय विखे, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार संतोष दानवे, आमदा, अभिमन्यू पवार आदी या बैठकीला उपस्थित होते.

    साखर उद्योगांचे खेळते भांडवल, कर्ज पुनर्रचना, आयकराचे विषय, को-जनरेशन इत्यादी अनेक विषयांवर आणि एकूणच साखर उद्योगांच्या अडचणी आणि उद्योगाचे सशक्तीकरण यावर चर्चा झाली. या सर्वच बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळास दिले.

    साखरेचा निर्यात कोटा हा वापरला गेला असल्याने हा कोटा वाढवून देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली, त्यावर योग्य आणि सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासनही शाह यांनी दिले.

    या वेळी सहकार क्षेत्रातील प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणावर चर्चा झाली.
    20 विविध मुद्यांवर त्यांना काम करण्याची आता संधी मिळेल. त्यामुळे कृषी व्यवसाय संस्था म्हणून त्यांना काम करता येईल.यातून ग्रामीण भागात सहकार बळकट होईल. यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, अशी सूचना अमित शाह यांनी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

    Amit shah assured full cooperation to cooperative sugar mills in maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना