• Download App
    पैसे नसल्याने नाकारली रुग्णवाहिका, पालघरमधील संतापजनक घटना; चिमुकल्याच्या मृतदेह बाईकवरून । Ambulance rejected due to lack of money, tragic incident in Palghar; body of boy taken to village from the bike

    पैसे नसल्याने नाकारली रुग्णवाहिका, पालघरमधील संतापजनक घटना; चिमुकल्याच्या मृतदेह बाईकवरून

    विशेष प्रतिनिधी

    पालघर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याची गंभीर घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. त्याचा मृतदेह सुमारे ४० किमी अंतरावर थंडीत कुडकुडत बाईकवरून न्यावा लागला. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली आहे. Ambulance rejected due to lack of money, tragic incident in Palghar; body of boy taken to village from the bike

    पायरवाडी येथे पहिलीत शिकणारा अजय युवराज पारधी (वय ६ ) याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. पालकांनी उपचारासाठी त्रिंबकेश्वर येथील दवाखान्यात त्याला दाखल केले. परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णलयात घेऊन गेले. परंतु तेथील डॉ. जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या रुग्णालयात मुलाला उपचारासाठी दाखल केले. २५ तारखेला रात्री९ वाजता कुटीर रुग्णालयात चिमुकल्याचा मृत्यू झाला.



    आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबाला मृतदेह आता घरी न्यायचा कसा? असा प्रश्न उभा ठाकला? पैसे देणार असाल तरच रुग्णवाहिका मिळेल, असे चालकाने अजयचे वडील युवराज पारधी यांना सांगितले. तसेच पैसे नसतील तर पायीपायी मृतदेह घेऊन जा, असेही त सांगण्यात आले. अखेर थंडीत सुमारे ४० किमी अंतरावर बाईकवरून अजयचा मृतदेह घेऊन ते पायरवाडीत येथे आले.ही घटना प्रशासनाच्या कारभार चीड आणणारी असून या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

    दोषींवर कडक कारवाई करण्याची  मागणी होत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जव्हार कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई कार्यवाही केली जाईल, असे एक वृत्तवाहिनीला सांगितले.

    Ambulance rejected due to lack of money, tragic incident in Palghar; body of boy taken to village from the bike

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस