• Download App
    अंबानीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन! बापाचा दर्शन घेण्यासाठी राजकारण्यांसह बॉलीवूड करांची मांदियाळी| Ambani Ganpati festival!

    अंबानीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन! बापाचा दर्शन घेण्यासाठी राजकारण्यांसह बॉलीवूड करांची मांदियाळी

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सध्या संपूर्ण राज्यभर गणपती बाप्पाचा जल्लोष बघायला मिळतोय. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव अगदी सर्वसामान्य माणसांपासून तर सेलिब्रेटी पर्यंत सगळ्यांच्याच घरी बाप्पांचं आगमन झालं आहे. काल घरोघरी बापाची प्राणप्रतिष्ठा करत बापाचं स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्राचा हा महाउत्सव असलेल्या गणपती उत्सव सर्वत्र दणक्यात साजरा होताना दिसतोय. भारतीय व्यापार विश्वातल मोठे नाव आणि रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्री चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घरी देखील गणरायाचं काल वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. Ambani Ganpati festival!



    मुकेश अंबानी यांनी देखील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांचे आलिशान घर अँटिलिया सजवले होत. वाजत गाजत त्यांनी गणपतीचे स्वागत केले. यानंतर बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाले होते.मुकेश अंबानी यांच्या ‘अँटीलिया’ या घरी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. या सेलिब्रेशनमध्ये संपूर्ण बॉलिवूडकरींनी हजेरी लावली होती.

    https://www.instagram.com/p/CxZtyD6PxDg/?utm

    यात आलिया भट्ट, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर, कियारा अडवाणी यांच्यासह अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थीती लावली. यावेळी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. नीता यांनी पिवळ्या आणि सोनेरी रंगाची पारंपारिक साडी नेसली होती.याच पार्टीत सलमान खान आणि दिग्दर्शक अॅटली देखील दिसला. याचबरोबर रेखा ऐश्वर्या बच्चन आपल्या मुलीसोबत दिसली. याच पार्टीत शाहरुख खान त्याची पत्नी गौरी, मुलगा अबराम आणि मुलगी सुहाना देखील आली होती.

    Ambani Ganpati festival!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sanjay Nirupam : संजय राऊत यांच्या नेपाळ हिंसेच्या विधानावरून वाद; संजय निरुपम यांची पोलिसांत तक्रार, देशविरोधी वक्तव्य केल्याने कारवाईची मागणी

    ठाकरे बंधूंच्या मिलनामध्ये शिवसेना + मनसेचे सैनिक मग्न; नाशिक मध्ये राजकीय कोमात ढकलले पवार + राहुल गांधींचे पक्ष!!

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार- ओबीसी समाजाला एक दुष्ट विचारांचा नेता मिळाला, ओबीसींत आमचे स्थान मिळवूनच राहू