विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Ambadas Danve विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांची हांजी – हांजी करताना त्यांची जीभ घसरली. Ambadas Danve
राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्यावर संताप व्यक्त करताना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्या अकरा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा केली होती. गायकवाड यांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण काय बोलत आहोत याचे भानच दानवे यांना राहिले नाही. म्हणाले, नरेंद्र मोदींची जीभ छाटणाऱ्याला 21 लाख देणार, यावर भाजपाने कोणती भूमिका घेतली असती तीच कारवाई संजय गायकवाडवर व्हावी. गायकवाड यांचे वक्तव्य काहीही असो. मात्र दानवे यांनी यामध्ये थेट पंतप्रधानांना आणत त्यांच्याविषयी अशा पद्धतीचे वक्तव्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. Ambadas Danve
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणायला, बोलताना भान सुटले की काय होते याचे हे उदाहरण आहे. राहुल गांधी यांना कुर्निसात करताना आपण काय बोलतोय याचे भानच दानवे यांना राहिले नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वातंत्र्य दिन लक्षात नसल्याबद्दल उद्धव ठाकरेंना थोबाडी द्यावीशी वाटते असे म्हटले होते. त्याचा किती गहाजब ठाकरे गटाने केला होता. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती बाबत आक्षपार्ह वक्तव्याचा आरोप करत कायद्यातील कुठली कुठली कलमे शोधून काढून राणीसाहेबांवर गुन्हा दाखल केला. जेवत ताटावरून त्यांना अटक केली. अंबादास दानवे हे विसरले का? Ambadas Danve
याच्यापुढे जाऊन दानवे म्हणाले, राहुल गांधींनी ते वक्तव्य केलेलेच नाही. ज्या वर्गाला आरक्षणाची गरज आहे, त्यांना ते द्यावं हीच आमचीही भूमिका आहे. पहिल्या पासून शेवटपर्यंत ते वक्तव्य ऐकल तर समजेल.
याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तळी ह दानवे यांनी उचलली. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर आरक्षण विरोधी असल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना पडळकर आणि शरद पवार ही तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे एखादा माणूस सूर्यावर थुंकत असेल, तर त्यावर काय बोलायचं? असे ते म्हणाले.
Ambadas Danve’s tongue slipped, controversial statement on Prime Minister Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- Arvind Kejriwals : ‘दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन’, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
- Prashant Kishore : प्रशांत किशोर यांनी घेतली शपथ, म्हणाले ‘सत्तेवर येताच हे निर्बंध….’
- Tejas Mark-2 : हवाई दलाला मिळणार नवी ताकद! 2025 मध्ये तेजस मार्क-2 घेऊ शकते पहिले उड्डाण
- Kejriwal & Thackeray : मोदींची तिसऱ्या टर्मची सत्ता उद्ध्वस्त करण्याचे पाहिले स्वप्न; पण दोन मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीला लागला सुरुंग!!