विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदू धर्मातील नागरिकांविषयी काढलेल्या अपशब्दाचा मुद्दा आज विधान परिषदेमध्येही गाजला. या सभागृहात निषेध ठराव घेण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. या विषयी बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपल्याला शिवीगाळ केली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी राजीनामा देऊन सर्वांची माफी मागावी, अशी मागणी देखील लाड यांनी केली आहे. Ambadas Danve was abused in the Assembly Session; BJP leader Prasad Lad demanded his resignation
राहुल यांनी लोकसभेत हिंदू धर्मातील नागरिकांविषयी केलेल्या वक्तव्याच्या मुद्द्यावर बोलताना दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी भर सभागृहातच शिवीगाळ केली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आमदार आक्रमक झाले असून अंबादास दानवे यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा आणि माफी मागावी अशी मागणी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद लाड यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मी जे सभागृहात बोललो ते बोललो, मी कुणालाही घाबरत नाही. माझ्यावर काय कारवाई करायची ते माझा पक्ष ठरवेल. पण पैसे घेऊन काम करणाऱ्या भाजपच्या प्रसाद लाड यांनी मला हिंदूत्व शिकवू नये, माझ्याकडे हातवारे केल्याने माझ्यातील शिवसैनिक जागा झाला अन् मी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी मला हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही. माझ्यावर देखील हिंदूत्वासाठी 75 केसेस आहेत, अनेकदा तडीपारीच्या केसेसला सामोरे गेलेलो आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांनी काय आरोप केले, याला मी फारसे महत्त्व देत नाही.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा, द्वेष-द्वेष-द्वेष करतात… तुम्ही मुळीच हिंदू नाही. सत्याचे समर्थन करावे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. पीएम मोदी आपल्या खुर्चीवरून उभे राहिले आणि त्यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. याचे पडसाद आज विधान परिषदेमध्ये देखील उमटले.
Ambadas Danve was abused in the Assembly Session; BJP leader Prasad Lad demanded his resignation
महत्वाच्या बातम्या
- राधाराणी वादप्रकरणी पं. प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी, दुसऱ्याला म्हटले होते राधाचा पती
- केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहार तुरुंगात राहणार; मद्य धोरणप्रकरणी CBIने केली होती अटक
- T20 world cup 2024 winner : टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवले, सूर्याच्या एका कॅचने फिरवली मॅच
- चेहऱ्याचा मुद्दा राऊतांनी घट्ट धरला; पवारांना बाजूला सारून राहुलच्या नावाने गूळ लावला!!