वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्राबाहेर मराठी मालिकांच्या शूटींगवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मुद्यावर त्यांनी निर्मात्यांचे कान उपटले आहेत.Amay Khopkar uproots the ears of the producers while starving his colleagues; Dissatisfied with the shooting of out-of-state series
कोरोना रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली होती. ब्रेक द चैन अंतर्गत कठोर निर्बंध लावले आहेत. यामध्ये शूटींगला बंदी आहे. त्यामुळे मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर गोवा, दमण, जयपूर तसंच सिल्वासा येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यावर ते बोलत होते. या निर्णयामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या कामगारांचं फार नुकसान होत असल्याचं अमेय खोपकर यांचं म्हणणं आहे.
तंत्रज्ञ, कामगारांना घरी बसविले
अमेय खोपकर ट्विटमध्ये म्हणतात, हिंदीप्रमाणेच मराठी मालिकांचं चित्रीकरण गोवा, दमण अशा ठिकाणी सुरु होतंय. निर्मात्यांचा नाईलाज समजू शकतो, पण बरेचसे तंत्रज्ञ तसंच कामगार यांना ‘लहान युनिटचा बहाणा करत’घरीच बसवून वाऱ्यावर सोडून दिले आहे. प्रेक्षक दुरावू नये, याची काळजी करतानाच आपल्याचं सहकाऱ्यांची उपासमार करतोय, याचं भान निर्मात्यांनी ठेवलंच पाहिजे.
Amay Khopkar uproots the ears of the producers while starving his colleagues; Dissatisfied with the shooting of out-of-state series
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना काळातील सर्वात मोठी पार्टी, मास्कशिवाय पोचले ५० हजार लोक
- दोनपेक्षा जास्त अपत्ये, येरवडा कारागृहाच्या अधीक्षिका निलंबबित
- कॅनडामध्ये कोरोना रोखण्यासाठी लष्कर तैनात
- अमेरिका जगातील इतर देशांना पुरविणार सहा कोटी कोरोना प्रतिबंधक लसी