वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील सुप्रसिद्ध अमर जवान ज्योती उद्या समारंभपूर्वक राष्ट्रीय युद्ध स्मारक ज्योती मध्ये विलीन करण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उद्या संयुक्त संरक्षण दलाचे प्रमुख एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ हा समारंभ होणार आहे.Amar Jawan Jyoti flame to be merged with National War Memorial flame on Friday
अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योती मध्ये विलीन झाल्यानंतर मूळ अमर जवान ज्योती प्रज्वलित करण्यात येणार नाही. ती इतिहासाचा एक भाग बनला बनून राहील.
अमर जवान ज्योती स्मारक ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधले आहे. त्यानंतर त्यामध्ये काही वेळा भर पडली. 1971 च्या युद्धानंतर काही नावे या स्मारकात घातली गेली. परंतु हे स्मारक ब्रिटिशांनी बांधले असल्याने स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2014मध्ये घेतला. त्यानंतर दोन वर्षात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधून पूर्ण करण्यात आले.
आता इथून पुढे राष्ट्रीय युद्ध स्मारक हेच मुख्य स्मारक म्हणून गणले जाणार आहे. त्यामुळेच अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योती क्विलिंग करण्यात येणार आहे.