प्रतिनिधी
मुंबई : प्रतापगडावर अफजल खानाच्या थडग्याभोवतीच्या अतिक्रमणावर शिंदे फडणवीस सरकारने बुलडोझर चालविला. शिवप्रताप दिनी ही कारवाई करण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक होत आहे. शिवप्रेमींनीही आनंद व्यक्त केला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून काही सूचना केल्या आहेत. Also remove encroachments on Vishalgad, Lohgad and other forts; Sambhaji Raj’s suggestion
प्रतापगडासोबतच आणखी दोन किल्ल्यांची नावे सूचवत संभाजीराजे यांनी आणखी दोन गडांवरील अतिक्रमणे हटवण्याची देखील मागणी केली आहे. संभाजीराजे यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
संभाजीराजे यांचे ट्वीट
अफजल खानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
उदय सामंत यांची प्रतिक्रिया
संभाजीराजे यांनी केलेल्या मागणीसंदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील भाष्य केले आहे. संभाजीराजे यांनी केलेल्या सूचनेवर राज्य सरकार नक्कीच सकारात्मक प्रयत्न करेल. याबाबत आम्ही नक्कीच संभाजीराजेंशी बोलून घेऊ, असे सामंत यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केल्याबाबत उदय सामंत यांनी संभाजीराजेंचे आभार मानले आहेत.
Also remove encroachments on Vishalgad, Lohgad and other forts; Sambhaji Raj’s suggestion
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांचा खालचा सूर; ईडी विरुद्ध कोणतीही तक्रार नाही; ठाकरे पवारांबरोबरच फडणवीस + मोदी + शाहांनाही भेटणार
- हिंदू शब्दाचा अर्थ घाणेरडा म्हणणाऱ्या कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनी अखेर मागितली माफी; पण…
- गुजरातमधील सिंह नोव्हेंबर अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश