• Download App
    आम्ही तीनही राजे कुटुंब म्हणून एकत्रच, संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा, राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप|All three of us together as a family, support Udayan Raje for Sambhaji Raje's movement

    आम्ही तीनही राजे कुटुंब म्हणून एकत्रच, संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा, राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप

    खासदार संभाजी छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हा विषय केंद्राचा नाही तर राज्याचा आहे. राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.All three of us together as a family, support Udayan Raje for Sambhaji Raje’s movement


    प्रतिनिधी

    सातारा: खासदार संभाजी छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही असे म्हणत

    खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हा विषय केंद्राचा नाही तर राज्याचा आहे. राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.



    सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यानंतर उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, संभाजीराजेंनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही. आम्ही तिन्ही राजे कुटुंब म्हणून एकत्र आहोत.

    आधी सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. सरकारला तेच सांगून कंटाळा आला आहे. किळस आली आहे. सरकारने या विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करावी. अधिवेशन बोलवा, लाईव्ह टेलिकास्ट करा.

    सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यावरच आम्ही नेतृत्व कोणी करायचे ठरवू.आरक्षण फक्त मागासवर्गीय समाजाला लागू होते असे म्हणणे चुकीचे आहे. मराठा असो की कोणीही असो आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करा.

    त्याचा वेगळा अर्थ लावू नका. जर लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवणार नसतील तर लोक दुसरा मार्ग निवडणारच ना. आज अनेकजण फास लावून घेतायेत, मात्र आता लोक फास लावून घेणार नाहीत. तर राज्यकत्यार्ना फास लावतील, आता ती वेळ लांब नाही, असा इशारा त्यांनी दिला.

    उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार दिशाभूल करत आहे. हा केंद्राचा विषय नाही. तो राज्याचा विषय आहे. मराठा आरक्षणावर अधिवेशन बोलवायला हवे. मराठा समाज हा महाराष्ट्रात मोठा समाज आहे.

    राजस्थानात मारवाडी बहुसंख्य आहेत. या समाजातील खासदार, आमदारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण लागू होत नाही. मात्र सरकारने गरिबांना तरी आरक्षण द्यावे.

    All three of us together as a family, support Udayan Raje for Sambhaji Raje’s movement

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस