• Download App
    Maharashtra मराठी प्रेमावरून उच्चशिक्षित नेत्यांचे शैक्षणिक धुमारे; पण काढताहेत एकमेकांच्या अपयशाचेच वाभाडे!!

    मराठी प्रेमावरून उच्चशिक्षित नेत्यांचे शैक्षणिक धुमारे; पण काढताहेत एकमेकांच्या अपयशाचेच वाभाडे!!

    नाशिक : महाराष्ट्रातला हिंदी सक्तीचा मुद्दा तापल्यानंतर अनेकांना मराठी प्रेमाचे उमाळे आले. त्यामध्ये अनेक मराठी साहित्यिक देखील शिरले. त्यांनी फडणवीस सरकार विरुद्ध तोंड शेकून घेतले. मधल्या मध्ये शिवसेना आणि मनसे यांचे मनोमिलन झाले. त्यामुळे भाजपचे नेते जास्त पेटले. या सगळ्या उच्चशिक्षितांना शैक्षणिक धुमारे फुटले, पण या सगळ्यांनी एकमेकांच्या अपयशाचेच वाभाडे काढले. Maharashtra

    स्वतःच्या मुलांना स्कॉटिश शाळेत शिकवायचे आणि मराठी प्रेमाचे उमाळे आणायचे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजपच्या प्रदेशाध्यक्ष बदलायच्या मेळाव्यात केले. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. मराठी माणसे एकत्र येतात हे लक्षात आल्यामुळे राज्यकर्ते हादरले. भाजपचे नेते कुणाच्या शाळेत शिकलेत हे सांगू का?, असा सवाल देशपांडे यांनी केला. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी पुढे रेटला.

    या सगळ्या भागात मराठी साहित्यिकांना देखील मराठी प्रेमाचे उमाळे आले. त्यांनी फडणवीस सरकारवर तोंड शेकून घेतले.

    पण हिंदी सक्तीच्या विरोधात जाऊन मराठी प्रेमाचे उमाळे आणणाऱ्या या सगळ्यांनीच स्वतःच्या आणि एकमेकांच्या अपयशाचे वाभाडे काढले. महाराष्ट्रासारख्या राज्यात हिंदीची सक्ती करावी लागली. त्याला विरोध झाला. पण महाराष्ट्रात मराठी माध्यमांच्या शाळा कमी होऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढतात त्यांचे पेव फुटले. यातल्या बहुसंख्य शाळा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनीच काढल्या. शिक्षण संस्थांचा बाजार मांडला. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आफली मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालून शिकवली. नंतर त्यांना परदेशात पाठवून मोठ्या पदव्या दिल्या. तथाकथित देश सेवेसाठी म्हणजे स्वतःचाच राजकीय वारसा चालवण्यासाठी भारतात परत आणले.

    पण या सगळ्यात गेल्या 75 वर्षांमध्ये सर्वच पक्षांच्या राज्यकर्त्यांनी मराठीकडे दुर्लक्ष केले. मराठी ज्ञानभाषा करण्याच्या दृष्टीने नुसत्या समित्या नेमल्या. त्या समित्यांचे अहवाल आल्यावर त्यावर वाद घातले. नंतर ते अहवाल बासनात गुंडाळून टाकून दिले. वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, शेती, संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदी विषयांचे ज्ञान मराठीत उपलब्ध होऊ दिले नाही. मराठी ज्ञानभाषा करण्यात सर्वपक्षीय नेते राज्यकर्ते आणि मराठी साहित्यिक अपयशी ठरले. मराठी साहित्यिकांनी “निवडक” राज्यकर्त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्या आणि अन्य राज्यकर्त्यांचे पाय चाटले हे दारुण सत्य सगळ्या महाराष्ट्राच्या समोर उघडे झाले. फक्त ते महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना आणि साहित्यिकांना दिसले नाही आणि पचले नाही. म्हणून ते एकमेकांचेच वाभाडे काढत बसले.

    व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर

    All politicians in Maharashtra falied to develop Marathi as knowledge language

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधिमंडळात गदारोळ; राजकारणाच्या मुद्यावरून अजित पवारांनी सुनावले

    काँग्रेसचे गमावलेले “राजकीय शहाणपण” परत येणार कधी??; संघावर बंदी घालायची काँग्रेस नेत्यांची खुमखुमी संपणार कधी??

    राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळी तरी कुठे लागला दिवा??