विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला वाटतेय फुटीची भीती आणि तरी आवळून दाखवताहेत वज्रमूठी!!, असे महाराष्ट्रात घडते आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी स्वतःच महाविकास आघाडी 2024 ची निवडणूक एकत्र निवडणूक लढेल की नाही हे आत्ताच सांगता येत नाही, असे अमरावतीत वक्तव्य केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये मोठी चलबिजल निर्माण झाली. शरद पवारांच्या कालच्या वक्तव्यावर आज संजय राऊत यांना त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत खुलासा करावा लागला तो खुलासा करताना देखील संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या विधानाचा अर्थ लावण्याबद्दल प्रसार माध्यमांवरच खापर फोडले.All parties in MVA fear of their own splits, but trying to keep the folks together
महाविकास आघाडी टिकावी ती फुटू नये, असे पवारांना वाटते. कारण पवार स्वतःच महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत आणि उद्धव ठाकरे हे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे 2024 ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढवेल. पण प्रसार माध्यमांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावला आहे, असा खुलासा संजय राऊत यांनी केला.
मूळात महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही घटक पक्षांना आपापल्या पक्ष फुटीचीच भीती वाटते आहे. शरद पवारांनी ही भीती अमरावतीत काल उघडपणे बोलूनही दाखवली आहे. फक्त ती भीती बोलून दाखवताना शरद पवारांनी इशारेवजा भाषा वापरली आहे. ज्यांना पक्ष फोडायचा आहे, ते फोडू शकतात. मग आम्ही आमची भूमिका घेऊ. याचा अर्थ पक्ष फुट करणाऱ्यांना वेगळ्या मार्गाने धडा शिकवू, असाच इशारा पवारांनी दिला आहे. पण या इशाऱ्यामागे मूळात राष्ट्रवादी फुटण्याची आणि आपल्या मनात नसलेले अजितदादा मुख्यमंत्री पदाच्या कुठल्याही पद मिळवण्याची भीती अथवा शक्यता पवारांना वाटत असल्याचे स्पष्ट होते.
त्याचबरोबर काँग्रेसला देखील आपल्या पक्ष फुटीची भीती आहे. भले भाजप काही विशिष्ट कारणे पुढे करून पक्ष फोडत असेल पण जे पक्ष भाजप फोडतोय, त्या पक्षांच्या नेत्यांमध्ये स्वतःचा पक्ष टिकवून ठेवण्याची क्षमताच नाही, हेच यातून दिसून येत आहे.
आणि अशा स्थितीत पवारांनी महाविकास आघाडी 2024 ची निवडणूक एकत्र लढविली नाही सांगता येत नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यावर संजय राऊत यांना महाविकास आघाडी एकत्रच आहे. तिचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत याचा खुलासा करावा लागला आहे. यातच बरेच काही आले!! पण तरीही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते आपल्या वज्रमूठी आवळूनच दाखवत आहेत.
All parties in MVA fear of their own splits, but trying to keep the folks together
महत्वाच्या बातम्या
- पादरी म्हणाला- उपाशी राहा मग येशूची भेट होईल, केनियात 29 जणांचा अंधश्रद्धेने मृत्यू
- ‘’एकत्र लढण्याची इच्छा आहे, पण…’’ शरद पवारांच्या सूचक विधानामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण!
- आयएसआयशी संबंध, पंजाबमध्ये हिंसाचाराचा कट, जाणून घ्या अमृतपाल सिंगवर का लावला NSA!
- अमित शहा म्हणाले- तेलंगणातील मुस्लिम आरक्षण संपुष्टात आणू, बीआरएस सरकारची उलटगणती सुरू