विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आधी खेचाखेची झाली. नंतर एकमेकांच्या उमेदवाऱ्या कापण्यासाठी काटाकाटी झाली. पण आता उमेदवारी अर्ज दाखल करायला एकच दिवस उरल्यानंतर उमेदवार याद्या जाहीर करण्याची सगळ्यांनाच घाई झाली.All parties are in a hurry to declare candidature lists
भाजपने आज 25 उमेदवारांची यादी जाहीर करून 146 चा आकडा गाठला. यामध्ये राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर करून लोकसभेतल्या पराभवाचे उट्टे काढायची संधी भाजपने त्यांना दिली. विदर्भातल्या उरलेल्या सगळ्या जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केले. यामध्ये फारसे फेरबदल नाहीत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7 उमेदवार जाहीर करून सत्तरी पार केली. पण मिरवणुकीच्या नादात अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन मिनिटांचा उशीर केला. त्यामुळे निवडणूक यंत्रणेने त्यांचा अर्ज दाखल करून घेतला नाही. त्यामुळे ते उद्या सकाळी 11.00 वाजता अर्ज दाखल करणार आहेत.
मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीत भांडणे
महाविकास आघाडीत जास्त खेचाखेची झाली. काँग्रेसला डबल डिजीट वर आणायच्या नादात पवारांच्याच राष्ट्रवादीची गोची झाली. काँग्रेसने तर शंभरी पार केलीच, पण पवारांना सत्तरी पार करताना दमछाक झाली. त्यांनी आपल्या यादीत सगळी घराणेशाहीची भरती केली. पण पवारांनी यंग ब्रिगेड मैदानात उतरवल्याची भलामण मराठी माध्यमांनी केली. मुंबई आणि परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद खूपच कमी आहे, पण तिथे भांडणे मात्र जास्त आहेत, याचे प्रत्यंतर जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांच्या मारामारीतून आले. पवारांच्या राष्ट्रवादीने बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्या पतीला म्हणजेच अहमद फरादला उमेदवारी दिली, पण पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यावर चिडले. आमच्या कोणाची पत्नी हीरोइन नाही म्हणून आम्हाला उमेदवारी मिळाली नाही असा टोमणा पवारांच्या कार्यकर्त्यांनी पवारांनाच मारला.
सरवणकर मुख्यमंत्र्यांचे ऐकेनात
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मधून पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जुंपली. सदा सरणवकरांनी एकनाथ शिंदे यांचे ऐकले नाही. त्यामुळे उमेदवार मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत, असे चित्र निर्माण झाले. महायुतीतल्या बाकीच्या नेत्यांनी सरवणकर यांची समजूत काढायचा प्रयत्न चालविला आहे.
All parties are in a hurry to declare candidature lists
महत्वाच्या बातम्या
- Congress अखेर 100 + पार; महाविकास आघाडीतल्या जागावाटपात ठाकरे + पवारांवर मात!!
- Sharad Pawar : यंदाच्या निवडणुकीत पवारांची यंग ब्रिगेड मैदानात, पण सगळे घराणेशाहीचे प्रतिनिधी!!
- Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचा महाराष्ट्रातील जागावाटपावरून ‘मविआ’ला इशारा!
- Siddhi Kadam रमेश कदम यांच्या मुलीला शरद पवारांनी दिली मोहोळमधून उमेदवारी, सर्वात कमी वयाची उमेदवार