• Download App
    नगरमध्ये धोक्याची घंटा ! जिल्ह्यातील 61 गावांमध्ये १३ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊनचे आदेशAlarm bells in the city! Lockdown orders in 61 villages in the district till October 13

    नगरमध्ये धोक्याची घंटा ! जिल्ह्यातील 61 गावांमध्ये १३ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊनचे आदेश

    कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.Alarm bells in the city! Lockdown orders in 61 villages in the district till October 13


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचं चित्र आहे. परंतु तिसऱ्या लाटेचं संकटही अजून कायम आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

    त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये १३ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेत.मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. विशेष म्हणजे अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढलेत



    ४ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ६१ गावांमधील संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. ज्या भागात जास्त रुग्ण आहेत, असे भाग कन्टेनमेंट झोन करणार. गावात कोणालाही येण्यास व जाण्यास प्रतिबंध.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, वस्तू, विक्री, सेवा बंद.पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासही मनाई. कृषी माल वगळता इतर वाहनांना गावात बंदी.

    अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश

    कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक २४ गावांचा यात समावेश आहे. ४ ऑक्टोबरपासून १३ ऑक्टोबरपर्यत हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय.

    यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल २४ , श्रीगोंदा तालुक्यातील ९, राहाता तालुक्यातील ७ तर पारनेर तालुक्यातील ६ गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आलाय.

    Alarm bells in the city! Lockdown orders in 61 villages in the district till October 13

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार